श्रीधर फ़डके वरील कार्यशाळा सध्या घेत आहेत. काल या कार्यक्रमाला जायचा योग आला.
संगीत कार्यशाळा याबद्दल माझे मत फ़ारसे अनुकूल नव्हते. चार पाच दिवसात कोणतीही कला अशी घाईघाईत पी हळद व हो गोरी style ने नाही जमत.
पण काल श्रीधरजींनी तीन गाणी तीन तासात शिकवली. व स्टेजवर त्यातील लोकांना गायला सांगितली.
केवळ तासभर शिकवल्यावर विद्यार्थ्यांनी ती सुरेख गायली. त्यातून त्या मुलांची तयारी किती आहे त्याचबरोबर श्रीधरजी किती उत्तम पध्दतीने शिकवतात या दोन्हीचा अनुभव आला. गाण्याचे कार्यक्रम आपण अनेकदा ऎकतो. पण संगीतकाराच्या मनात असलेली चाल तो गायकाकडून कशी गाऊन घेत असेल याचे कुतूहल होते. ते काही अंशाने कमी झाले. बारीकसारीक जागा, ताल, लय, सगळे एकेका टप्प्यात श्रीधरजी सांगत होते. फ़ुलले मधील ’फ़ु’ –हस्व आहे तो तसाच यायला हवा.. इतके बारकावे सुध्दा त्यात आले.
काही मुलामुलींना ती गाणी मराठीत असल्याने लिहून घेताना त्रास होत होता कारण शिक्षणाचे माध्यम इंग्रजी..
एकूण सगळ्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.
काल शिकवलेली गाणी.
१. दे साद दे हृदया
२. कलिका, कशा गं बाई फ़ुलल्या
३. अकार, उकार, मकार..
मानापमान- काही मुद्दे
17 hours ago
4 comments:
lucky you
ayes. lucku you
Yes.. It was indeed out of this world experience for me..
खूपच छान अनुभव असेल तुझा...मज्जा पण आली असेल. पुण्यनगरीच्या बाहेर (परदेशातच असल्यामुळे) ह्या सगळ्यापासुन आम्ही वंचित राहतो हे सारखे जाणवत असते. इलाज नाही. तु लिहीलेले अनुभव वाचूनच समाधान मानते मी. श्रीधर फडके माझे पण एकदम आवडते आहेत.
Post a Comment