Wednesday, July 1, 2009

कला की कलाकार

मायकेल जॅक्सन हा विषय आता प्रसिध्दीमाध्यमांना कित्येक वर्षे पुरुन उरेल. त्याच्या आकस्मिक मृत्यूनंतर मनात कला की कलाकार हा विचार परत एकदा आला.

मध्यंतरी गौरी देशपांडे या orkut community ची विंचुर्णीला ट्रीप गेली होती. तेव्हा मी गेले नाही. मनात येत होते की गौरीचे लेखन, त्यातले विचार आवडतात. म्हणून तिच्या घरी, तिच्या वस्तू बघायला जाणे, त्यांचा संग्रह करणे.. आणि त्याचे अवडंबर माजविणे बरोबर आहे का ?

कोणत्याही कलाकाराची कला थोर की तो कलाकार ? शेवटी तो एक माणूस असतो. हे विसरले जाते. व कलाकाराच्या व्यक्तिगत जीवनात जास्त डोकावले जाते. त्याने / तिने कसे वागावे हे समाज (म्हणजे आपणच) ठरवायला लागतो. आणि मग त्याच्या कलेवर कधी कधी अन्याय होतो.

मायकेल जॅक्सन ला १३ grammy award मिळाली यात त्याचे कलाकार म्हणून मोठेपण सिध्द झाले. बाकी तो व्यक्ती म्हणून काय होता यावर चर्वितचर्वण करुन काय साधणार आहे ?

अनेक ठिकाणी मला त्याच्याबद्दल ’कितीही controversy असली तरी तो कलाकार म्हणून निर्विवादपणे थोर होता’ अशा अर्थाच्या comments आढळल्या आणि खूप बरे वाटले…

2 comments:

Abhi said...

एखादा कलाकार आपल्याला आवडायला लागल्यावर त्याच्या खासगी जीवनात तो कसा वागतो त्यात आणि आपल्यात काही साम्य आहे का हे पाहण्याचा प्रयत्न करणे हे अगदी सहज घडणारे पातक आहे आणि ते टाळावे या साठी वाचकांचे प्रयत्न असला पाहिजे.

- अभी

Priyaranjan Anand Marathe said...

Agdi Barobar. Pan kai hota mahit ahe ka? Kalakar apla vatu lagto ani mag tycha ayush dokavaicha ichha hota, Sahajik ahe he yar