Monday, December 15, 2008

अस्वस्थ अक्षरांच्या गर्दीत हिंडताना…


भल्या पहाटे सिंहगड चढलो.. चंद्र आकाशात दिसत होता. मस्त वाटले. वर जाऊन नेहमीप्रमाणे खेकडा भजी, दही, भाकरी, पिठलं खाल्लं. उतरायला सुरुवात केली. ८-१० वर्षाची २०-२५ मुलेमुली दिसली. कुठून आली आहेत विचारल्यावर रायगड असे कळले. त्यातल्या एका मुलीच्या हातात जड सामान, दुस-या हातात ओढणी.. मग माझा सोबती तिला म्हणाला.. चिमणे, तुझी ओढणी बांधून देतो. त्याने मस्तपॆकी तिच्या कमरेला ओढणी नीट बांधली. आता जरा तिला चढणे सोपे जाईल..

पुढे गेलो तर अजून एक बालचमू.. उरणहून आलेत असे कळले. समारंभाला जावे तसे पोशाख करुन सर्वजण आले होते. पुढे गेलो तर त्या मुलांच्या शिक्षिका एका माणसाचे आभार मानताना दिसल्या. त्या माणसाला सिंहगडाच्या पायथ्याशी एक चिमुकली पर्स सापडली होती. शाळेतील मुलीची होती असे सांगणारे कोणी भेटले. मग तो आत्ताच उतरुन गेला होता तरी परत चढायला लागला. साधारण १/३ वर चढल्यावर भेट्लेल्या त्या शिक्षिकेने ती पर्स ओळखली. त्यात ३० रुपये होते. त्या माणसाशी बोलल्यावर तो म्हणाला.. आपण शाळेत असताना ५ रुपये सुध्दा आपल्याला किती होते. मग त्या मुलीला हे ३० रुपये महत्वाचे असणार, या विचाराने मी येथपर्यंत आलो।
रोजच्या वर्तमानपत्रातील पॆशासाठी खून, मारहाण, फ़सवणूक इ. बातम्या वाचतो. या अनुभवाने रविवार एकदम आनंदात गेला. असेही अजून घडते तर.. !

3 comments:

Narendra Damle, words to speak and a heart to listen said...

अशा घटना खरेतर खूप घडत असतात आसपास, पण आपल्या नजराच बदलल्या आहेत की काय कळत नाही.
लाल गॉगल घालून सगळं अवकाश रक्तरंजित दिसत असताना कुठूनसा एक गुलाबी किंवा निळा ठिपका दिसल्यावर कसं वाटतं असं काही वाचलं, जाणवलं की.

Atul said...

faar chaan vatle vachun!

Nitin Kulkarni.... said...

ase ajunihi ghadatech.... so we are alive...