Tuesday, December 2, 2008

mumbai terrorist attack यावरुन सुचलेले काही (बाही) विचार

अ. IT मधील बंदा - मनोगत

१. गाडी servicing ला द्यायची आहे.
२. CA कडे जायचे आहे.. income tax returns राहिलेच आहेत अजून
३. मुलीच्या शाळेत मीटींग आहे.
४. बायकोला गाण्याच्या क्लासला सोडायचे आहे..
५. मॉल मध्ये जाऊन नवीन कपडे घ्यायला हवेत. उद्या presentation आहे.
६. च्यायला.. रस्ते महानगरपालिकेने किती वाईट बांधलेत. भिकारी मुले किती मध्ये मध्ये येतात.
७. सालं.. india मधे काही life नाही..
८. नवीन मॅक्डोनाल्ड try करायलाच हवं.. मुलीच्या शाळेत सगळे तिला ’इतकंही माहिती नाही का’ म्हणून चिडवतात रे..
९. सवाई गंधर्व ला जायला हवं.. मागच्यावर्षी माझा junior गेला होता ना.. फ़ार भाव खात होता..
१०. चांगला मुंबईला hayat मध्ये meet ला जायचा chance होता.. या अतिरेक्यांनी ’माझ्या’ career ची वाट लावली.
११. christmas च्या सुट्टीत फ़िरायला जावे तर त्या xyz resort मध्ये swimming pool नाही साधा..
१२. हेमंत करकरे गेले त्याची शोकसभा.. अरे वेळ नाही बाबा.. जागतिक मंदी आलीय.. कुठे गुंतवणूक करावी याची मीटींग आहे consultant सोबत.. मी वेळ मिळाला तर e-condolances पाठवितो... वाचून दाखव.

ब. मध्यमवयीन गृहिणी - मनोगत

१. आपल्या घराजवळ मुसलमान वस्ती जरा जास्तच वाढलीय..
२. मिठाईवाला मुसलमान आहे.. त्याच्याकडून sweets घ्यायला नको वाटते.. (काल घेतले सामोसे.. काय करणार.. उन्हाचे कुठे लांब जाणार.. बरं quality चांगली असते मेल्याची !! )
३. गिरणी एक बोहरी बाई चालविते.. तिच्याकडून दळण आणणे नको वाटते.. (जवळपास दुसरी गिरणी नाही.. आपण स्वत: आणले नाही तर तो ज्वारीवर गहू घालतो..)
४. जागतिक शांती वरची पुस्तके.. नको बाई.. मला आपल्या कुसुम अभ्यंकरांच्या कादंब-याच ब-या वाटतात.. छोट्या छोट्या कथांचे कथासंग्रह वाचते ना मी.
५. कालच बाईला शिळे झाले म्हणून चांगले पाव किलो पेढे दिले. या मोलकरणींना कितीही द्या.. कौतुक नाही. त्या जोशांकडचे काम मेली मन लावून करते.. मी इतके सगळे देऊन आपलं काम असं.. नशीबच वाईट..
६. वृध्दाश्रमात नको वाटते बाई.. सारखे त्या म्हाता-या लोकांचे हाल पाहून डोळ्यात पाणी येते.. थांबायला मात्र नको.. कसले कसले रोग असतात त्यांना..
७. हेमंत करकरे.. किती देखणे होते ना.. अकाली गेले अगदी.. त्यांच्या बाहिणीचं पत्र वाचलं का.. डोळ्यात पाणी आलं अगदी.. शोकसभा..असले काही करायला वेळ कुठे आहे ? मधुरांगणचे कार्यक्रम बुडतात..
आणि भिशी असते ना माझी.. साडी आणायला हवी नवीन.. सगळ्या माझ्या साड्या बघितल्या आहेत आता group मध्ये.

क. नोकरी करणारी स्त्री / तरुणी.. - मनोगत

१. terrorist attack मुंबईत झालेत म्हणून एक दिवस सुट्टी द्या असे बॉसला म्हणले तर तो म्हणे मुंबईत attack तुमचा काय संबंध.. या शाल्मलीच्या शाळेपायी कुठे सिनेमा बघणे होत नाही. जरा सुट्टि मिळाली असती तर ’दोस्ताना’ टाकला असता..
२. शाल्मली म्हणत होती तर साधे रव्याचे लाडू करुन देता येऊ नयेत का सासूबाईंना ? तिला सांभाळतात त्याचे कौतुक आहे ना ? आम्ही नोकरी करुन घर सांभाळतो तर सारखे ’घरात फ़ार काम’ असा टिमका चालू असतो. आता वेगळे राहावे म्हणले तरी शाल्मलीचा प्रश्न आहेच.. सहन करणे भाग आहे..
३. ऒफ़िसमधे - सर आज लवकर जाऊ का ?
१. मुलीचा वाढदिवस आहे.
२. xyz डोहाळजेवण आहे.
३. गाडीत पेट्रोल भरायचे आहे.
४. तुळ्शीबागेत जायचे आहे. एरवी वेळ नसतो.
५. ऒफ़िसमधील एक लग्न आहे.. तासभर जाऊन येते.
६. लग्नाचा वाढदिवस काल झाला ना.. काल सुट्टि झाली.. पण आज त्याची पार्टी एक मॆत्रीण मागतेय.. लवकर येते जेवून.. चायनीज मध्येच जाणार आहोत..
४. हेमंत करकरे.. ATS , NSG पेपर बिपर वाचायला वेळ नाही. ते हल्ले पाहून मात्र पोटात तुटले.. ते कमांडोज helicopter मधून कित्ती छान उतरत होते ना.. अभिषेक बच्चन त्या फ़लाण्या सिनेमात अगदी अस्साच उतरतो..
५.विलासराव देशमुख.. एवढं काय झालं रितेशला नेलं म्हणून..ताज पाहायाचा असेल त्याला.. त्याच्या career चा प्रश्न आहेच.
६.शोकसभा.. नको बाई.. घरी दारी सारखं tension नको वाटतं.. त्यापेक्षा ते नवीन mexican food वालं restaurant try करु असं म्हट्लं याला..

ड. पत्रकार - मनोगत

१. मुंबईत स्फ़ोट झाले त्या हॉटेल शेजारी माझं ओफ़िस.. जरा रात्रीच्या duty वर असताना चक्कर मारायला गेलो तर .. रस्ता cross करुन येता येता गोळीबाराचा आवाज.. सुदॆव म्हणून जीव वाचला..
२. हा अनुभव आता सगळ्यांना सांगायला नको.. हा अणि नंतरचा रेल्वे स्टेशन वरचा byte मिळाला त्याचे अनुभव एकत्र करुन एक मस्त story बनवायला हवी.
३. एवढी वर्षं या पत्रकारितेत काढून एक पुस्तक नाही माझं.. आता या अनुभवांवर एखादं पुस्तक छापतो.. त्याचा सिनेमा झाला तर फ़ारच बरं..
४. माझ्या जिवाची काळजी म्हणून एक फ़ोन नाही साधा.. आता मीच सगळ्या मित्रमॆत्रीणींना मेसेज टाकतो.. कोण बरं ती हां.. शिल्पा.. काल zee 24 taas वर होती.. तिला टाकायला पाहिजे मेसेज.. zee वर चान्स मिळाला तर बरे..
५.हेमंत करकरे शोकसभेला जावे लागणार.. .. फ़िल्म फ़ेस्टिव्हलचे coverage आवडले असते पण सध्या हाच विषय hot आहे.. त्या xyz इंग्रजी वृत्तपपत्रात चान्स मिळाला तर बघायचेय.. मराठी पत्रकारितेत राम नाही.

ई. एक प्रोफ़ेसर.. - मनोगत

१. आजकालचे हे तरुण अतिरेकी.. यांना जीवनविषयक मूल्ये वगॆरे काही कळत नाही. धर्म म्हणजे काय हे तरी कळते का यांना? निघालेत धर्माच्या नावाने गोळीबार करत..
२. नाशिकला त्या विद्यापीठात जायचे होते काल.. १० पुस्तके syllabus म्हणून छापली गेली तर घराचा हप्ता भरणे सोपे होईल. या अतिरेकी हल्ल्याने सगळेच डळमळीत झालेय.
३. कॉलेजमध्ये principle सोबत बोलून विद्यार्थ्यांसाठी अतिरेकी आणि दहशतवाद यावर चर्चासत्र आयोजित करायला हवे. मी असे विधायक कार्य करतो त्यामुळे त्यांचा लाडका आहे. इतर प्रोफ़ेसर जळतात माझ्यावर.
४. शोकसभेला जायला नक्कीच आवडले असते.. पण बायको मागे लागलीय.. दोन दिवस गाडी काढून ट्रीपला जाऊयात.. तिचाही संसारात विचार करायला हवा.. मी स्त्रियांना समानतेने वागवतो..

7 comments:

bumblebee... said...

छान लिहिलं....!

* terroist ऐवजी terrorist म्हणायचंय का तुम्हाला..?

Prabhas said...

mast aahet sagalech vichar :)
chhanach...

http://my.opera.com/prabhas/blog

Ruminations and Musings said...

Thanks Bumblebee.. Have corrected the spelling..:)

HAREKRISHNAJI said...

खरच, आपण किती अलिप्त असतो अश्यावेळी. ही दुःख, या वेदना, हि झालेले प्राणहानी कशाकशानेही आपल्या मन जरादेखील हेलावत नाही का ? येवढे आपण मुर्दाड का बर बनत असतो ? आपल्याला कशाशी ही देणेघेणे नसते. मी आणि माझे या बंदिस्त, सुरक्षीत कोषात मी रमलेलो असतो.

आपण प्रत्येकाचे मनोगत खुपच प्रभावीपणे मांडले आहेत. नक्कीच अगदी असाच विचार माणसे करीत असणार. माझ्यासारखा कोणीतरी असा विचार करणार, अरेरे मी आत्ता पुण्यात नसुन मुंबईला असतो तर नक्कीच फोटॊ काढायला गेलो असतो आणि आखोंदेखा हाल ब्लॉग वर लिहीले असते, कारण हे सारे माझ्या घराजवळ्च होत होते.

btw. आपला ब्लॉग मस्त आहे. खुप आवडला. जवळजवळ सर्व वाचुन काढला.

३,४,५ तारखेला रामकृष्ण मठात संगीत महोत्सव आहे, जाणार आहात काय ?

Chandrakant said...

Very nicely put..
Looks too original and natural...
Hats off to your thinking..

Keep it up..

Kiran.Walimbe said...

I wonder if this is just a coincidence?
http://www.misalpav.com/node/5020
Whatever the case may be, I liked the version on your blog.

Ruminations and Musings said...

बाप रे, किरण.. blog वरचे लिखाण चोरी होते याचा हा माझा पहिला अनुभव.. अजून सवय होईल हळूहळू.. :)