झिहाल- ए-मुस्किन मुकों बा रंजिश, बहाल-ए-हिजरा बेचारा दिल हॆ
सुनायी देती हॆ जिसकी धडकन, तुम्हारा दिल या हमारा दिल हॆ
या गाण्यातील पहिल्या ओळीबाबत फ़ार कुतूहल होते. कारण या गाण्याचे गीतकार आहेत गुलजार.. पण पहिली ओळ गुलजारच्या typical शॆलीतली वाटत नव्हती.. व कळत तर अजिबातच नव्हती.
तर माहिती मिळाली ती अशी की ही ओळ सूफ़ी कवी आमिर खुस्त्रो यांच्या एका रचनेवरुन घेतली आहे.
झिहाल- ए-मुस्किन मुकों-बा रंजिश, बहाल-ए-हिजरा बेचारा दिल हॆ
याचा अर्थ आहे..
झिहाल = लक्ष देणे.
मिस्किन = गरीब.
मुकों = नकार
बा-रंजिश = दुष्ट हेतू, शत्रुत्व
बहाल = ताजा.
हिजरा = विरह
याचा एकूण अर्थ : बिचा-या त्या हृदयाकडे लक्ष दे आणि त्याच्याकडे शत्रुत्वाने पाहू नकोस. ते विरहाच्या जखमांनी विध्द झालेले आहे.
दर्द जब तेरी अता हॆ तो गिला किससे करे
हिज्र जब तूने दिया हॆ तो मिला किससे करे
या आशा भोसले यांनी गायलेल्या गझल मध्ये ही विरहाचे वर्णन आहे. सूफ़ी संतांच्या रचनांमध्ये प्रेम व अल्ला या दोघांनाही ब-याचशा रचना लागू पडतात. यात एक अर्थ अल्लापासून लांब गेलेला (त्याचा विरह झालेला) असाही असू शकतो.
ओ पुणे
1 year ago
6 comments:
कधी कधी वाटतं की प्रेम आणि भक्ती या एकाच भावनेच्या दोन छटा आहेत.जरा मान वळवली किंवा मन वळवलं की एकीतून दुसरीत जातो.
सुंदर. बरेच दिवस याचा अर्थ शोधत होतो.
हे गाणे आशा भोसलेंनी गायले आहे की लतादीदींनी? गोंधळ होतोय.
राज, झिहाल ए मुस्किन हे गाणे लता मंगेशकर व शब्बीरकुमार यांनी गायले आहे..
मी ज्या गझल चा उल्लेख केला आहे.. ’दर्द जब तेरी अता हॆ’ ती आशाबईंनी गायली आहे.
And thanks for appreciating it.
You are right. my mistake.
मला लताचे ते गाणेच आठवत होते. ही गझल नाही ऐकलेली.
क्या बात है ! बहुत खुब.
दिल ही तो है न संग-गो-ख़ीश्त दर्द से भर न आये क्यो ?
रोयेंगे हम हजार बार, कोई हमे सताये क्यो ?
कैद-ए-हयात-ए-बन्दे-ग़म अस्ल मे दोनो एक है मौत से पहले आदमी ग़म से निजात पाये क्यो ?
गालिब-ए-ख़स्ता के बगैर कौन से काम बदं है ? रोइये जार-जार क्या, कीजिये हाय-हाय क्यो ?
i wanted to write in marathi...
but dont know how to change the font anyway
about ur song..
more than the song i liked d movie'ghulami".nothng has changed today also.the same old moneylenders .d same parched farmers..
and the hopes of communism dat ll bring them d happiness all waded away.
pls write about the movie too
regards
prashant
Post a Comment