Showing posts with label Musings. Show all posts
Showing posts with label Musings. Show all posts

Monday, August 16, 2010

Wild Strawberries – Ingmar Bergman




Wild Strawberries – Ingmar Bergman

या सिनेमाचा गुलजार यांच्या मौसमवर बराच प्रभाव आहे असे ऎकून माहिती होते. हे Wild Strawberries चे आकर्षण असण्याचे पहिले कारण. सिनेमा स्वीडीश दिग्दर्शक Ingmar Bergman चा आहे जो Autumn Sonata, Scenes from a marriage मुळे माहिती होता.

Wild Strawberries ची कथा बर्गमनने हॉस्पिटलमधे असताना लिहिली. ’स्व’ चा व माणुसकीचा घेतलेला शोध यामुळे बर्गमनचा हा सर्वात भावुक, सकारात्मक व आणि उत्कृष्ट सिनेमा समजला जातो. यातील मध्यवर्ती व्यक्तिरेखा आहे इझाक बोर्गची. इझाकला सभोवताली घडणा-या गोष्टींचे मानसशास्त्राच्या दॄष्टिकोनातून आकलन होऊ शकते अशी देणगी लाभलेली आहे.

’इझाक बोर्ग’ हा ७५ वर्षांचा एक डॉक्टर आहे. त्याची पत्नी मरण पावलेली आहे. सून मुलाबरोबर झालेल्या मतभेदांमुळे त्याच्यासोबत राहाते व त्याची आई ९५ वर्षांची आहे. लुंड विद्यापीठातून त्याने त्याची डिग्री मिळवलेली आहे. आता त्या विद्यापीठाने त्याच्या विज्ञान व मानवजातीच्या भल्यासाठी केलेल्या कार्याचा एक पदक देऊन विशेष गौरव करण्यासाठी त्याला बोलावले आहे. Stockholm ते लुंड असा ४०० मॆलांचा प्रवास तो या सिनेमात स्वत:च्या सुनेबरोबर करतो. या प्रवासात तो स्वत:च्या पूर्वायुष्यात डोकावतो. त्या भूतकाळातील आठवणींचा प्रवास त्याला घडतो. चित्रविचित्र स्वप्ने पडतात.निरनिराळे लोक भेटतात. त्याचा एकटेपणा व एकाकीपणा त्याला स्वत:च्या आईमधे व मुलामधे आहे असेही जाणविते.अखेरीस तो स्वत:चा भूतकाळ, वर्तमानकाळ व लवकरच येऊ घातलेला मृत्यू स्वीकारतो. अशी काहीशी स्थूलमानाने कथा.

सिनेमात मानसशास्त्रीय बारकावे मात्र असंख्य सापडतात. यातील स्वप्नदॄश्यांसाठी हा सिनेमा फ़ार गाजला. सिनेमाच्या सुरुवातीलाच इझाकला एक स्वप्न पडते.

अज्ञात ठिकाणी तो उभा आहे. जिवंतपणाचा आजूबाजूला लवलेश नाही. तो रस्त्यावरच्या एका घड्याळाकडे पाहातो.. त्या घड्याळाला काटेच नाहीत. मग तो खिशातून एक घड्याळ काढतो… त्यालाही काटे नाहीत. काटे नसलेले घड्याळ म्हणजे काळ पुढे जात नाही.. तो थांबलेला आहे. अशी अवस्था उदभवते याची एकच शक्यता – म्रूत्यू.. गोंधळलेल्या इझाकला लांबवर एक पाठमोरा माणूस दिसतो. त्याला स्पर्श केल्यावर तो सामोरा येतो.. तर त्याचा चेहरा असंख्य bandages ने भरुन गेला आहे. जो ओळखणे शक्यच नाही. त्याचे डोके अचानक धडापासून तुटते व रक्ताचे ओहोळ वाहतात. तेवढ्यात चर्चच्या घंटेचे आवाज ऎकू येतात व दोन घोडे एक शववाहिका घेऊन येतात. गाडीवानाचा पत्ता नाहीच. मग ती गाडी दिव्याच्या खांबाला अडकते. एक चाक तुटते. गाडी निघून जाते व त्यातील प्रेत बाहेर येते.. ज्यात इझाक ला स्वत:चाच चेहरा दिसतो. इथे तो स्वप्नातून जागा होतो.

जागा झाल्यावर तो प्रथम काय करतो तर लुंडला जाण्याचा मार्ग बदलतो. मुलगा त्याची जिथे वाट पाहाणार आहे ते सोडून थेट लुंडला जायचे ठरवतो. दिसलेल्या मृत्यूला हुलकावणी देण्याचा तो प्रयत्न करतो आहे का ? Freud च्या ट्रेन चुकली आहे अशा स्वप्नाचा जो अर्थ आहे तोच यात येतो. म्रुत्यू येणार आहे तेव्हा आपण तिथे नसावेच (ट्रेन चुकावी) अशी इच्छा असलेले स्वप्न.

मरियान , इझाकची सून त्याच्यासोबत प्रवासाला निघते. आयुष्यात पहिली २० वर्षे उन्हाळी सुट्ट्या जिथे घालवल्या त्याच ठिकाणी तो वाटेत थांबतो. सगळे मिळून ती दहा भावंडे असतात पण आता तो एकटाच उरला आहे. मरियानला या सगळ्या जुन्या आठवणी सांगाव्याशा त्याला वाटतात. पण तिला त्यात रस नाही. मग तो एका strawberry च्या झुडुपांपाशी बसून जुने दॄश्य आठवतो.. (मौसम मधील झाडाआडून स्वत:च्या जुन्या दिवसांकडे पाहाणारा संजीवकुमार.)

त्याला आता दिसतो आहे तो इझाकच्या वडिलांचा वाढदिवस आहे तो दिवस.. त्याला त्याची दूरची बहीण सारा strawberry वेचताना दिसते. ते एकमेकांच्या प्रेमात आहेत. एकमेकांशी लग्न करणार आहेत. तेवढ्यात त्याला त्याचा भाऊ सिगफ़्रिड दिसतो.. जो सारावर बळजबरी करतो आहे. इझाक यात दुबळा पडतो. व सिगफ़्रिड आपल्या कार्यात यशस्वी होतो.

पुढच्या प्रसंगात हे सगळे पाहिल्याचे इझाकच्या वडिलांना दोन जुळ्या बहिणी सांगतात. सारा रडत रडत आत जाते व एका नातेवाईक स्त्रीसोबत बोलते. ती म्हणते की इझाक शांत, दयाळू वृत्तीचा असला तरी सिगफ़्रिड आक्रमक, exciting आहे. एका लहान मुलापेक्षा ती पुरूषाला हो म्हणणे पसंत करेल.

या प्रसंगाचे दोन अर्थ एक, इझाक (Issac) हा बायबल मधे साधा, समजूतदार आहे तर अब्राहम (येथे सिगफ़िड) आक्रमक आहे. दुसरा म्हणजे आत्ताचा इझाक हा संशयी, स्वार्थी आहे. जो एकेकाळी संवेदनाशील तरुण होता. जणू काही आता त्याने स्वार्थी, दुष्ट अशा सिगफ़्रिडचे रुप घेतले आहे.. (transformation)..आणि तो साराला म्हणतो आहे की तुला जसा हवा होता तशा प्रकारचा पुरुष मी बनलो आहे. तो जणू सूड घेतो आहे.. पण असे सूडाचे प्रकार व्यक्तिमत्व दुभंगतात. माणूस नंतर स्वत:चाच द्वेष करू शकतो.

आता वाटेत त्याला परत एक सारा भेटते. एक तरुण, नटखट पोरगी.ती इझाकला म्हणते की सारा आणि इझाक असे जोडपे होते ना ? तो म्हणतो नाही.. जोडपे होते ते अब्राहम आणि सारा. (सारा ही इझाक ची आई.) सारा त्याला सांगत रहाते की तिच्यासोबत असलेल्या दोन तरुणांपॆकी एकजण स्वप्नाळू आणि आदर्शवादी आहे तर दुसरा तडफ़दार आणि व्यवहारचतुर आहे.. ती दुस-याला मोहात पाडण्याचा प्रयत्न करते आहे. परत एकदा सिगफ़्रिड, इझाक द्वंद्व या रुपात दिसते.

नंतरच्या एका प्रसंगात ते इझाकच्या वयोवृध्द आईला भेटायला जातात. आई मरियानला इझाकची बायकोच समजते. ती मरियानला सांगते की मला दहा मुले होती आता इझाक एकटाच उरला आहे.. (इझाकचे वडिल, सिगफ़्रिड असे त्याचे प्रतिस्पर्धी नाहीसे झालेत..आणि आता या अर्थहीन आयुष्यात तो एकटाच उरला आहे.) आई तिच्याकडच्या जुन्या वस्तूंमधून एक मनगटी घड्याळ काढते व सांगते की ते ती सिगफ़िडच्या मुलाला देणार आहे जो आता ५० वर्षांचा होईल. ते तेच काटे नसलेले (इझाकला स्वप्नात दिसलेले) घड्याळ आहे.

यानंतर इझाकला परत एकदा स्वप्न दिसते..

ज्यात सारा strawbetrry पाशी आहे. व ती इझाकला दूषण देते आहे. ती म्हणते की तू लवकरच मरशील इतका म्हातारा आहेस व मला तर अजून सगळे आयुष्य पडले आहे…मी जाते. मला सिगफ़्रिडच्या मुलाची काळजी घ्यायला हवी. यानंतर त्याला सिगफ़्रिड व सारा आनंदात पियानो वाजवताना दिसतात. अचानक दिवे जातात. व एक माणूस लांबलचक passage मधून इझाकला घेऊन जातो. तो एक patient तपासायला सांगतो. पण इझाकला निदान करता येत नाही. मग तो माणूस त्याला याबद्दल क्षमा मागायला सांगतो. इझाक ती मागतोही.. मग त्याला एका स्त्री रुग्णाचे निदान करायला सांगतात. तो म्हणतो पण ती तर मेलेली आहे. मग ती स्त्री (त्याची बायको) हसायला लागते. तो माणूस म्हणतो तुझ्यावर स्वार्थी, दुस-याचा विचार न करणारा असे गुन्हे दाखल केले आहेत. (अर्थातच त्याच्या बायकोने) पण ती तर मेली आहे. असे इझाक म्हणतो.

पण तो माणूस त्याला भूतकाळ समोर आणायला लावतो. इझाक ची बायको व्यभिचार करते. ती क्षमा मागते तेव्हा इझाक म्हणतो त्यात क्षमा करण्यासारखे काय आहे ? त्याच्या या दयाळूपणानेच ती हळूहळू मरत जाते.( एखाद्या गुन्ह्याची शिक्षा मिळावी, त्यातूनच त्याचे क्षालन होईल अशी मानवी मनाची प्रवृत्ती असते.. )

इझाक विचारतो याला आता शिक्षा काय? तो माणूस म्हणतो.. नेहमीचीच. एकांतवास..(मृत्यू ?)

इथे इझाक स्वप्नातून जागा होतो. तो मरियानला म्हणतो की जागेपणी स्वत:पाशी ज्या गोष्टी तो सांगू शकत नाही त्या त्याला स्वप्नात दिसतात. मुख्य म्हणजे जिवंत असताना आपला मृत्यू झाला आहे अशी कल्पनादेखील तो करु शकत नाही. मरियान म्हणते की तिचा नवरा (इझाकचा मुलगा) देखील असेच म्हणतो. तो फ़क्त ३८ वर्षांचा असला तरी तो म्हातारा होऊन मेला आहे असे त्याला भास होतात.

मरियानचे नव-याशी भांडण मूल होण्यावरुन आहे. तिला ते हवे आहे आणि त्याला अर्थातच नको आहे. एका दु:खी जोडप्याचे आपण नको असलेले मूल आहोत आणि तसेच सगळे एकाकी, वॆफ़ल्यग्रस्त आयुष्य अजून एका मुलाला आपण देऊ नये असे त्याला वाटत असते.

सिनेमाच्या शेवटी इझाकला ते पदक मिळते.

त्यानंतर तो दोन चांगल्या गोष्टी करायचा प्रयत्न करतो. त्यातील एक म्हणजे मुलाला त्याने दिलेले कर्ज तो माफ़ करायची इच्छा व्यक्त करतो. पण मुलगा ते करु देत नाही. मागे जाऊन भूतकाळ कधीच बदलता येत नाही. त्याला साराचा आवाज ऎकू येतो.. “इझाक, सर्व strawberries संपल्या आहेत.” भूतकाळातील रम्य आठवणी आणि काहीसा पश्चात्ताप मनात घेऊन इझाक झोपी जातो. एक दिवस संपतो आणि सिनेमाही..

काळ कोणासाठीच कधी थांबत नाही हे अटळ सत्य या सिनेमात सतत सांगितले आहे. काळ आपल्यावर हुकुमत गाजवत रहातो.. बालपणी आपल्याला अधिकार नसतात, म्हातारपणी संधी मिळत नाही. हा सिनेमा पाहून सुधीर मोघेची कविता अपरिहार्यपणे आठवते.

मन मनास उमगत नाही आधार कसा शोधावा ?
स्वप्नातील पदर धुक्याचा हातास कसा लागावा ?

मन थेंबांचे आकाश लाटांनी सावरलेले
मन ऩक्षत्रांचे रान अवकाशी अवतरलेले
मन रानभूल मन चकवा

मन काळोखाची गुंफ़ा मन तेजाचे राऊळ
मन सॆतानाचा हात मन देवाचे पाऊल
दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ?

चेहरा मोहरा याचा कधी कुणी पाहिला नाही
धनी अस्तित्वाचा तरीही याच्याविण दुसरा नाही
या अनोळखी नात्याचा कुणी कसा भरवसा द्यावा ?

Tuesday, March 2, 2010

दिलसा कोई कमीना नही…



ऎसी उलझी नजर उनसे हटती नहीं, दात से रेशमी डोर कटती नही
उम्र कब की बरस के सफ़ेद हो गयी, कारी बदरी जवानी की छटती नही
वल्ला यह धडकन बढने लगी हॆ, चेहरे की रंगत उडने लगी हॆ
डर लगता हॆ तनहा सोनेमें जी…
दिल तो बच्चा हॆ जी, थोडा कच्चा हॆ जी
किसको पता था पहलू में रखा, दिल ऎसा पाजी भी होगा
हम तो हमेशा समझते थे कोई, हम जॆसा हाजी ही होगा
हाय जोर करे कितना शोर करे, बेवजह बातें पे गौर करे,
दिलसा कोई कमीना नही…
कोई तो रोके कोई तो टोके, इस उम्र में अब खाओगे धोके
डर लगता हॆ इश्क करने में जी, दिल तो बच्चा हॆ जी…१
ऎसी उदासी बॆठी हॆ दिल पे, हंसने से घबरा रहे हॆ
सारी जवानी कतरा के काटी, पीरी में टकरा गये हॆ
दिल धडकता हॆ तो ऎसे लगता हॆ वह, आ रहा हॆ यही देखता ही न वह
प्रेम की मारे कटार रे…
तौबा यह लम्हे कटते नही हॆ क्यूं , आंख से मेरी हटते नही हॆ क्यूं
डर लगता हॆ मुझसे कहने में जी, दिल तो बच्चा हॆ जी…. २

इश्कियां मधील हे राहत फ़तेह अली खान यांनी अतिशय उत्तम गायलेले गाणे.. काहीसे ६० च्या दशकातील गाण्यांच्या संगीताची आठवण करुन देणारे. यात मधेच अरेबिक संगीत आहे.. विशाल भारद्वाज यांचे या चित्रपटातील मला हे गाणे सर्वात जास्त आवडले आहे.
गुलजार यांच्या नेहमीच्या शॆलीतील गाणे आहे.. त्यांनी ते सहज लिहिले असावे.. गदिमांची गीते कशी .. ’झाला महार पंढरीनाथ, काय द्येवाची सांगू मात’… मध्ये गावरानपणा व ’निजरुप दाखवा हो’ मधे एक सदाशिव पेठी बाज आणतात.. तसे’प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम ना दो’.. व ’दिलसा कोई कमीना नही’ मध्ये गुलजार यांचे झाले आहे.. दोन्ही प्रेमाचीच गाणी पण.. इश्किया मधील भाषा हा एक स्वतंत्र विषय आहे. त्यात हे गाणे चपखल बसते.
अर्धसत्य मधला लोबो, त्रिदेव चा ओये ओरडणारा नायक, मासूम मधला जेके, मंडीमधला तुंद्रूस.. नसिरुद्दीन शहा यांचे किती रोल्स आठवावेत.. इश्किया मधे त्यांचा अभिनय उत्तम आहेच.. पण दिल तो बच्चा हॆ हे गाणे व नंतर एक सत्य कळल्यावरचा अर्धा तास दुखावलेपणाचा अभिनय केवळ अप्रतिम.. मनात गाणे घर करुन राहाते.. एक ठसठसती जखम असावी तसे..

Friday, December 11, 2009

शाहरुख खान – dish tv adoption ad आणि कलिंगड..





शाहरुख च्या dish tv च्या जाहिराती मला फ़ारशा कधीच आवडल्या नाहीत.. परवा मात्र चक्क एक अतिशय हृदयस्पर्शी जाहिरात पाहायला मिळाली..

http://www.youtube.com/watch?v=a7AJj5aDhXc

एका अनाथाश्रमातून ते दोघे एक मुलगी adopt करतात.. तिने त्यांच्या घरात रूळावे, आनंदाने राहावे म्हणून आटोकाट प्रयत्न करतात. जरा नाराज होऊनच आईवडिल झोपतात… तोच त्यांना त्या मुलीचे खळखळून हसणे ऎकून जाग येते. मुलगी dish tv वर कार्टून बघून हसते आहे.. आईवडिल ते बघून अगदी भारावून जातात.. आधी मूल झाले नाही म्ह्णून घेतलेला adoption चा निर्णय तोही ’मुलगी’ adopt करण्याचा.. त्यात आता घरात आलेल्या मुलाने आनंदात राहावे अशी इच्छा.. ते जमत नाही याचे वॆफ़ल्य.. आणि ते मूल हसल्यावर.. होणारा आनंद.. ४५ सेकंदाच्या जाहिरातीत इतके काही कळत जाते की बस.. प्रसून जोशी व अनुराग बसू यासारखी नावे यामागे आहेत.. शाहरुखचा जमलेला अभिनय आहे.. जाहिरात बघून ती परत कधी लागेल याची अनेक वर्षांनी वाट पाहिली यात सगळे आले.

आता या topic चा उत्तरार्ध ’कलिंगड’..

गौरी देशपांडे च्या आहे हे असं आहे मध्ये कलिंगड नावाची एक कथा आहे. साधारण या जाहिरातीसारखीच..

एक मुलगी adopt केलेली.. ती मुलगी घरात अगदी शहाण्यासारखी वागते.. एका उन्हाळ्यात तिला आणतात.. पुढ्च्या वर्षीच्या उन्हाळ्यापर्यंत मुलगी रूळते.. पण एकूण ऋणानुबंध जुळत नाहीत.. एकदा मायलेकी कलिंगड खरेदी करायला जातात.. मग त्या विचारतात.. गोड आहे ना रे बाबा.. प्रश्नोत्तरात फ़ळ्वाला म्हणतो.. “मी काय आत शिरुन पाहिलंय?”

मुलीला एकदम हसू येते.. ती म्हणते काय मजा ना.. आत शिरुन कलिंगडात राहायचं.. सगळीकडून गार गोड..

आणि मग एकदम आईला आपले लहानपण आठवते.. त्यांचे जिवाभावाचे मॆत्र त्या कलिंगडात राहायच्या विचाराने एकदम जुळते.. (कथा मुळातूनच वाचायला हवी !! )
जाहिरातीच्या निमित्ताने परत एकदा हे सगळे आठवले.. आठवणी सुध्दा कशा कुठे पोहोचतील याचा काय नेम ?

Friday, November 20, 2009

This world's a fiction and is made up of contradiction




जमाना बदल रहा हॆ….

१. कमीने : प्रियांका व शाहिद.. एका camp साठी गेलेले.. रात्री तो गडबडीत condom शोधतो आहे.. तिला वेळ नाही.. ती सांगते मला home science माहिती आहे.. safe व unsafe दिवस कळतात मला…यात त्यांचे लग्न झालेले नाही हाही एक मुद्दा आहे..
माझ्या एका वयाने जरा senior मित्राला फ़ोनवर हा dialogue या चित्रपटात आहे असे सांगितले तर त्याचा अर्थातच विश्वास बसला नाही..
२. wake up sid :
a. मी कलकत्त्याहून मुंबईला आले ते स्वत:चे घर असावे, स्वत:चे पॆसे मिळवावेत या हेतूने.. I want to become independent.. असे कोंकणा सेन (चित्रपटात आयेषा).. सांगते.
केवळ लग्न होऊनच मुली घर सोडतात या आपल्या समाजातील समजुतीला छेद देणारे हा संवाद..

b. याच चित्रपटात रणबीर कपूर - सिध्दार्थ – सिद घर सोडतो व चक्क आयेषा कडे येऊन विचारतो.. मी तुझ्या घरात राहू शकतो का ?
आसरा मागायचा स्त्रीने व द्यायचा पुरुषाने या अजून एका समजुतीला छेद देणारा हा संवाद..

३. सकाळ वर्तमानपत्र : दि. २०/११/२००९ पुरूषांना पाककलेचे धडे देणा-या मेघा गोखले यांच्यावरचा लेख.. त्यांनी जितक्या पुरूषांना ही कला शिकवली आहे ते सर्वजण आपापल्या किचनमध्ये त्याचा वापर करतात.. असे एक वाक्य आवर्जून लिहिले होते..
यावर विशेष काही लिहावं याची गरज नाही.. इतका तो लेख बोलका आहे..


क्या जमाना सचमुच बदल रहा हॆ ?

१. ओळखीची एक काम करणारी मुलगी. भरपूर खर्च करुन आईवडिलांनी लग्न करुन दिलेले… सासू रोजच्या लागणा-या (साबण वगॆरे) गोष्टी कपाटात ठेवते.. व ही ते जुमानत नाही म्हणून नवरा मारतो.. ती pregnant असताना..
२. अजून एक उदाहरण.. सासूला toliet sense असून वृध्दापकाळाने ती जायचा कंटाळा करते.. व सर्व आवरावे अशी सुनेकडून अपेक्षा.. न केल्यास नवरा मारहाण करतो..
३. सकाळ मधीलच एक बातमी : ४५ व्या वर्षी मूल झाले .. तेव्हाच त्या माणसाच्या मुलीला मुलगा झाला.. त्याची लाज वाटून स्वत:च्या नवजात मुलाला फ़ेकून दिले..

रोजच असे विरोधाभास असलेले अनेक प्रसंग दिसतात.. मनात कल्लोळ उमटतो.. !!

Thursday, November 5, 2009

इसे रिश्तोंका इल्जाम ना दो..




नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही
सा-याच चांदण्यांची जगतास जाग नाही..

या ओळी आठवाव्यात असे अनेक फ़ोन.. फ़क्त फ़ोन मॆत्री..

तो.. एक कलंदर माणूस …असावा.. ! भेटलो नाही कधी.. बोलतो फ़क्त.. आणि ते सुध्दा या जगातले असते असे नाही..

फ़ोन नं १ : वेळ : साधारण रात्री ११ ते २ च्या दरम्यान कोणतीही.. आणि फ़ोन कानाशी लागल्यावर ऎकू येते ती गिटार..मग गझल.. “आज जाने की जिद ना करो.. युंही पहलूमें बॆठे रहो.. “.. फ़ोनचे कारण काय तर एक विशिष्ट जागा फ़क्त female voice मध्येच चांगली वाटते. ती तेवढी तिने म्हणावी… मग तिने ती ऎकवली की आता एकदम फ़ार उशीर झाला आहे.. तू झोप आता.. आणि फ़ोन बंद..

फ़ोन नं २ : ती एका मित्राकडे.. काहीतरी गप्पा चालल्या आहेत. फ़ोन वाजतो.. आणि फ़ोनचे कारण काय तर.. त्याने एक फ़ुलपाखरु पाहिलेले व तिची आठवण आलेली.. ते सांगणे अपरिहार्य.. हो वेळ अगदी सभ्य…दुपारचे दोन.. (for a change)..

फ़ोन नं ३ : वेळ रात्री ९ ..ती drive करते आहे.. फ़ोन वाजतो.. ती अर्थातच घेत नाही. मग सिग्नलला फ़ोन पाहाते.. त्याचा दिसतो.. ती जरा पुढे जाऊन गाडी कडेला घेते.. व त्याला फ़ोन लावते.. गाडीत गाणे ’न जाने क्यूं’ मग फ़ोन सुरु झाल्यावर गप्पा फ़क्त सलील चौधरी..

फ़ोन नं ४: वेळ त्याच्या दॄष्टीने योग्य म्हणजे रात्रीचे १ किंवा दोन.. तो गोव्यात.. त्याला एक music album चे शूटींग आहे.. आणि बरेच दिवस लांबले होते.. ते काम आता चालू झाले आहे.. हे सांगण्यासाठी .. सोबतीला गिटार व हरिहरनचे.. “जब भी मिलते हो .. मुस्कुराते हो.. इतनी खुषियॉ कहांसे लाते हो.. “..

असे अनेक फ़ोन.. सुरुवातीला इतक्या रात्री उशीरा फ़ोन वगॆरे विचार होतेच.. पण हळूहळू ते मनाला कळले.. की ही फ़ोन मॆत्री.. बाकीच्या आयुष्यातील सुख दु:खांचा इथे विचार नाही.. हे एक असे पण नाते..

Thursday, October 1, 2009

गाण्यांच्या गोष्टी.. ऋतू हिरवा..




काल श्रीधर फ़डके, आरती अंकलीकर व मधुरा दातार यांच्या ऋतू हिरवा या कार्यक्रमाला जायचा योग आला. सकाळ माध्यम प्रायोजक होते. सिध्दी गार्डन येथे सुरेख मंडप उभारलेला आहे. आसनव्यवस्था उत्तम केलेली आहे.

जय शारदे वागीश्वरी ने सुरुवात झाली.

स्पर्शातूनी तव देवते साकार ही रुचिराकृती
शास्त्रे तुला वश सर्वही विद्या कला वा संस्कृती..
लावण्य काही आगळे भरले दिसे विश्वांतरी

हे मूळ रेकॉर्ड मध्ये नसलेले कडवे या कार्यक्रमात श्रीधरजींकडून ऎकायला मिळाले. ऋतू हिरवा या अल्बम च्या अनेक आठवणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने ऎकायला मिळाल्या. स्वत: संगीतकाराकडून त्या ऎकायला मिळणे हे भाग्यच..

ऋतू हिरवा हे गाणे श्रीधरजींनी आशा भोसले यांना ऎकविले. व त्यावर त्या म्हणाल्या ’मी करेन हे गाणे’.. आणि त्यानंतर एक वर्षभर त्या या अल्बम साठी वेळ देऊ शकल्या नाहीत. मग एक दिवस त्या श्रीधरजींना म्हणाल्या ..की हे गाणे फ़ार अवघड आहे. जे कोणी हे गाणे कार्यक्रमात गातात..त्यांना हा किस्सा ऎकून धन्य वाटेल. काल मधुरा दातार ने हे अप्रतिम सादर केले.

घनरानी.. या गाण्याची आधी चाल सुचली. ती श्रीधरजींनी शांताबाईंना ऎकविली. त्यावर त्यांनी अवघ्या काही मिनिटांमध्ये गाणे लिहून दिले. मधुरा दातार ने हे गाणे काल ऎकविलेच.. पण नंतर चाल कशी बांधली हे सांगताना चालीतले व शब्दोच्चारातले अनेक बारकावे श्रीधरजींनी ऎकविले.

फ़ुलले रे क्षण हे गाणे नितीन आखवे यांनी १६ वेळा लिहिल्याची कथाही ऎकायला मिळाले.. आपण perfectionist आहोत त्यामुळे कवींना फ़ार त्रास देतो असे काल श्रीधर फ़डके यांनी सांगितले.


सांज ये गोकुळी मधील आशा भोसले यांनी recording च्या वेळेला किती वेगवेगळ्या जागा घेतल्या याचेही सादरीकरण काल ऎकायला मिळाले. आपल्या सर्व गाण्यांचे श्रेय त्यांनी कवींना व गायक / गायिकांना आहे हे अतिशय नम्रपणे अनेक वेळा सांगितले.

हे गगना हे कुसुमाग्रजांचे गाणे.. याची शब्दरचना अतिशय उत्तम आहे..

हे गगना..
तू माझ्या गावी आणि तिच्याही गावी
तुला उदारा पहिल्यापासून सर्व कहाणी ठावी..

याला अगदी चपखल चाल आहे. आणि गीतरामायणात जसे सीता व राम यांच्या गाण्यात रामाचा उल्लेख प्रसंगाप्रमाणे करते (मज आणून द्या तो हरीण अयोध्यानाथा, थांबला कशास्तव धनुर्धरा हो आता.... किंवा जेथे राघव तेथे सीता या गाण्यात जानकीनाथा.. असे प्रसंगानुरुप उल्लेख आहेत..) तसे या गाण्यात पुढे

घन केसांतूनी तिच्या अनंता फ़िरवीत वत्सल हात.. अशी एक ओळ आहे.

यात गगना, उदारा, अनंता असे आकाशाला निरनिराळे समर्पक शब्द वापरले आहेत. असो..

अशा अनेक गाण्यांच्या गोष्टी काल ऎकायला मिळाल्या. आरती अंकलीकर यांनी गगना गंध आला, होऊनी मी जवळ येते, तेजोमय नादब्रम्ह.. नवीन ’सुर वरदा रामा’ यातील ’ताने स्वर रंगवावा’ आणि अर्थातच.. मी राधिका, मी प्रेमिका उत्तम सादर केले.

मन कशात लागत नाही
अदमास कशाचा घ्यावा
अज्ञात झ-यावर रात्री
मज ऎकू येतो पावा..

या ओळी ग्रेस यांच्या.. त्यांना श्रीधरजींनी चाल बांधली. पण पुढची कविता कळत नसताना पुढे चाल बांधणे त्यांना पसंत नव्हते. ( perfectionist चा हा अर्थ आहे.. कवितेला चाल लावणे.. व एक उत्तम गाणे तयार करणे यात फ़रक आहे.. असे काल त्यांनी स्वत:च सांगितले.)

मग सुधीर मोघे यांनी त्या चालीवर
मन मनास उमगत नाही, आधार कसा शोधावा, स्वप्नातील पदर धुक्याचा, हातास कसा लागावा.. असे शब्द लिहून दिले..

दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा.. या ओळी फ़ार अस्वस्थ करतात नेहमीच. तसे कालही झाले.

या गाण्यांच्या गोष्टी चालत राहातील.. आत्ता थांबते आहे.

Monday, August 31, 2009

इतनीसी बात..

माणसाचा खरा चेहरा दिसतो तो आपण ज्यांना आपल्याहून कमी दर्जाचे समजतो त्यांच्याशी वागताना. काटेकोरपणे सामाजिक रीतीरिवाज सांभाळणारे लोक… आपल्या driver किंवा घरकाम करणा-या नोकरांशी कसे वागतात ते कधीतरी एखाद्या क्षणी दिसते मग गंमत वाटते..

मला लालजी आठवला. परदेशात असताना माझ्या office मध्ये तो office boy होता. आम्ही दोघेही भारतीय असल्याने माझ्याशी त्याच्या गावाकडच्या गोष्टी सांगायच्या. राजस्थानात कुठेतरी त्याचे गाव होते. सुखदु:खे सांगायला व आपल्या भाषेत बोलायला जीव व्याकुळ झाल्यावर काय होते त्याचा अनुभव दोघांचा सारखाच..

Office मध्ये coffee प्यायला मी माझ्या आवडीचा नाजूक फ़ुलाफ़ुलांचा एक मोठा थोरला मग आणला होता. लालजी त्यातून मला coffee आणून द्यायचा..

एक दिवस अक्षरश: थरथरत तो आला व मला म्हणाला.. madam तुमचा कप फ़ुटला चुकून माझ्या हातून.. मी अर्थातच सहजपणे म्हणाले.. त्यात काय.. आणेन की नवीन..

मी रागावले देखील नाही याचे त्याला आश्चर्य वाटले आणि मी इतक्या क्षुल्लक गोष्टीवरुन त्याला रागावेन अशी त्याने अपेक्षा धरावी याची मला लाज वाटली. कमला या सिनेमात कमलाला मालकीण वर सोफ़्यावर बसायला सांगते व तिला ते शक्य होत नाही.. अशा गोष्टींमुळे मनाला कायमचे चरे पडतात…

Wednesday, July 1, 2009

कला की कलाकार

मायकेल जॅक्सन हा विषय आता प्रसिध्दीमाध्यमांना कित्येक वर्षे पुरुन उरेल. त्याच्या आकस्मिक मृत्यूनंतर मनात कला की कलाकार हा विचार परत एकदा आला.

मध्यंतरी गौरी देशपांडे या orkut community ची विंचुर्णीला ट्रीप गेली होती. तेव्हा मी गेले नाही. मनात येत होते की गौरीचे लेखन, त्यातले विचार आवडतात. म्हणून तिच्या घरी, तिच्या वस्तू बघायला जाणे, त्यांचा संग्रह करणे.. आणि त्याचे अवडंबर माजविणे बरोबर आहे का ?

कोणत्याही कलाकाराची कला थोर की तो कलाकार ? शेवटी तो एक माणूस असतो. हे विसरले जाते. व कलाकाराच्या व्यक्तिगत जीवनात जास्त डोकावले जाते. त्याने / तिने कसे वागावे हे समाज (म्हणजे आपणच) ठरवायला लागतो. आणि मग त्याच्या कलेवर कधी कधी अन्याय होतो.

मायकेल जॅक्सन ला १३ grammy award मिळाली यात त्याचे कलाकार म्हणून मोठेपण सिध्द झाले. बाकी तो व्यक्ती म्हणून काय होता यावर चर्वितचर्वण करुन काय साधणार आहे ?

अनेक ठिकाणी मला त्याच्याबद्दल ’कितीही controversy असली तरी तो कलाकार म्हणून निर्विवादपणे थोर होता’ अशा अर्थाच्या comments आढळल्या आणि खूप बरे वाटले…

Monday, April 27, 2009

संगीत कार्यशाळा – भारत गायन समाज

श्रीधर फ़डके वरील कार्यशाळा सध्या घेत आहेत. काल या कार्यक्रमाला जायचा योग आला.

संगीत कार्यशाळा याबद्दल माझे मत फ़ारसे अनुकूल नव्हते. चार पाच दिवसात कोणतीही कला अशी घाईघाईत पी हळद व हो गोरी style ने नाही जमत.
पण काल श्रीधरजींनी तीन गाणी तीन तासात शिकवली. व स्टेजवर त्यातील लोकांना गायला सांगितली.

केवळ तासभर शिकवल्यावर विद्यार्थ्यांनी ती सुरेख गायली. त्यातून त्या मुलांची तयारी किती आहे त्याचबरोबर श्रीधरजी किती उत्तम पध्दतीने शिकवतात या दोन्हीचा अनुभव आला. गाण्याचे कार्यक्रम आपण अनेकदा ऎकतो. पण संगीतकाराच्या मनात असलेली चाल तो गायकाकडून कशी गाऊन घेत असेल याचे कुतूहल होते. ते काही अंशाने कमी झाले. बारीकसारीक जागा, ताल, लय, सगळे एकेका टप्प्यात श्रीधरजी सांगत होते. फ़ुलले मधील ’फ़ु’ –हस्व आहे तो तसाच यायला हवा.. इतके बारकावे सुध्दा त्यात आले.

काही मुलामुलींना ती गाणी मराठीत असल्याने लिहून घेताना त्रास होत होता कारण शिक्षणाचे माध्यम इंग्रजी..

एकूण सगळ्यांचा उत्साह वाखाणण्यासारखा होता.

काल शिकवलेली गाणी.

१. दे साद दे हृदया
२. कलिका, कशा गं बाई फ़ुलल्या
३. अकार, उकार, मकार..

Wednesday, February 18, 2009

The Red Balloon




पाय-या उतरुन शाळेत निघालेला एक चिमुरडा. त्याला अचानक एक मोठा लाल फ़ुगा दिसतो.. आता उरलेल्या चित्रपटात प्रत्येक फ़्रेम मध्ये तो लाल फ़ुगा आहे. हलकेच तो टांगलेला फ़ुगा सोडवून घेतो व पुढे निघतो. काही क्षणांतच लक्षात येते की त्या फ़ुग्याला त्याचे स्वत:चे मन व इच्छाशक्ती आहे. आता पास्कल (चिमुरड्याचे नाव.. ) जाईल तिकडे फ़ुगा जातो. घरात स्थान मिळत नाही तर रात्रभर पास्कलच्या बेडरुमबाहेर लटकत राहातो. शाळेत, दुकानात, बाजारात तो सतत पास्कलच्या अवतीभवती असतो.
लवकरच गावातील टारगट मुलांना या फ़ुग्याबद्दल कळते. एका गल्लीच्या टोकाशी ती दबा धरुन बसतात. पास्कल व त्यांची पळापळ होते. यात ती मुले तो फ़ुगा कसा हस्तगत करतात ती ट्रिक बघताना मजा येते व दु:खही होते. अखेर ब-याच झटापटीनंतर ती मुले लाल फ़ुगा हस्तगत करतात. एकजण गलोलीने तो फ़ुगा फ़ोडतो.. फ़ुगा लहान होत जातो.
एक नवल घडते.. शहरात त्या क्षणी जिथे जिथे फ़ुगे असतात ते आपापल्या ठिकाणाहून निघून पास्कलपाशी पोहोचतात.. चित्रपटाच्या शेवटी पास्कल त्या फ़ुग्यांना धरुन हवेत तरंगतो आहे.
सुखाच्या फ़ुग्यांच्या मागे लागणे सोडले तर आपोआप अनेक सुखे आपल्याला येऊन बिलगतात असे त्या क्षणी मला वाटले. कारण पास्कल सोबत मी ही तरंगत होते.
15, Park Avenue हा सिनेमा पाहून आम्ही जे कोणी सोबत होतो त्यांचे शेवटच्या दॄश्याबद्दल काय मत आहे ? असा नंतर परतताना विषय झाला. तसे Red Balloon चे आहे. त्याच्यातली प्रतीके, शेवट यावरुन अनेक अर्थ निघतील.
तर असा हा The Red Balloon.. अवघ्या ३४ मिनिटांचा खिळवून ठेवणारा हा चित्रपट. ही कथा पूर्वी वाचली होती पण सिनेमा हे माध्यम कसे परिणामकारक आहे ते परत एकदा जाणविले. Albert Lamorisse या फ़्रेंच दिग्दर्शकाचा हा १९५६ मधील सिनेमा. त्यांना याचे Oscar ही मिळाले आहे. पास्कल हा या दिग्दर्शकाचाच मुलगा. यात संवाद नाहीत. फ़क्त background music.. पण पास्कलची निरागसता, शाळेतील शिक्षकांचा उग्रपणा व शिस्त, टारगट मुलांचा मस्तीखोरपणा सुरेख चित्रित झाला आहे.
चिमुरड्या पास्कलसोबत लाल फ़ुग्यासारखा मीही प्रवास केला. तो जे काही जग त्याच्या नजरेतून पहातो ते मलाही अनुभवायला मिळाले. पास्कलच्या घरातील लोक त्याला तो फ़ुगा आत आणून देत नाहीत तेव्हा, रोजच्या सकाळमधला कुत्र्याचे पिल्लू आणून देत नाहीत म्हणून नाराज होणाराचिंटू समोर आला.
गल्लीच्या तोंडाशी दबा धरुन बसलेल्या त्या कार्ट्याची भीती व राग असे एकाचवेळी मनात आले. Khalid Hussaini च्या The kite runner मधला पतंगामागे धावणारा हसन आठवला. कथेत साधर्म्य काही नाही. पण जिवाच्या आकांताने धावणा-या त्या चिमुकल्यांमध्ये नक्कीच एक समान धागा आहे.
लाल फ़ुगा पाहाताना एक गोष्ट अजून आठवली. या चित्रपटात फ़ुग्याचा लाल रंग प्रत्येक फ़्रेममध्ये प्रकर्षाने उठून दिसतो असे बाकीचे रंग राखी, फ़िके निळे आहेत. तसेच speilberg च्या schindler’s list मध्ये तीन प्रसंग रंगीत आहेत. सुरुवात, शेवट व एक लहान मुलीचा लाल फ़्रॉक आहे. चित्रपट black and white आहे. पण त्या मुलीचा लाल फ़्रॉक दोन वेळा दिसतो. प्रथम तो लाल फ़्रॉक दिसतो तेव्हा का ते कळत नाही. पण दुस-या वेळी तो प्रेतांच्या ढिगा-यात दिसतो.. आणि प्रातिनिधिक तत्वावर असे हजारो लाखो मुलांचे बळी गेलेत हे सूचित करतो.
लहान मुलांच्या निरागस दॄष्टिकोनातून एक फ़ुगा, त्याबरोबरची गंमत अनुभवणे मात्र मला नाही जमले. Charlie Chaplin चे चित्रपट लहानपणी बघताना हसू यायचे तसे आता येत नाही.. त्यामागचे हसरे दु:ख जाणवत राहते तसे काहीसे..

Thursday, February 12, 2009

परिचय..

म्हणेन ओळख झाली अपुली
परंतु परिचय झाला नाही..

कुसुमाग्रज

परिचय चित्रपटात प्राण शेवटी जितेंद्रला म्हणतो की ’तुमने मेरे बच्चोंसे मेरा परिचय करा दिया’ .. तेव्हा प्रत्येकवेळी सिनेमा बघताना अपरिहार्यपणे कुसुमाग्रजांच्या या वरच्या ओळी आठवतात.

परिचय हा सिनेमा लहानपणी कसा पाहिला याची माझ्यापाशी एक मजेदार आठवण आहे. माझी आई व आत्या मधूनमधून आम्हा भावंडांना माझ्या वडिलांपाशी ठेवून सिनेमाला जात असत. मला एकदा त्यांच्या बेताचा सुगावा लागला. मग रडून ओरडून गोंधळ घातला व त्या दोघी मला सिनेमाला घेऊन गेल्या. त्या वयात लक्षात राहिलेल्या दोन गोष्टी एक म्हणजे कासवाच्या पाठीवर मेणबत्ती लावलेला तो सीन व सा रे के सारे हे गाणे ..

पुढे अनेक वर्षांनी sound of music पाहिला. त्यातले सेट म्हणे अजूनही ज्या देशांमध्ये shoot झाले (Austria) येथे जपून ठेवले आहेत.

तर परिचय.. नुकतेच विजय पाडळकर यांचे गुलजार च्या सिनेमांवर ’गंगा आये कहां से’ हे पुस्तक आणले. त्यात या सिनेमाबद्दल फ़ार सुंदर लिहिले आहे. एका ठिकाणी ते म्हणतात..

माणसामाणसातील नाती का तुटतात या प्रश्नाकडे गुलजारांचे मन सतत वळत राहिले आहे. आयुष्यभर अव्याहतपणे ते या प्रश्नाचे उत्तर शोधत राहिले आहेत. त्यांच्या जवळजवळ सा-या चित्रपटांत तुटलेल्या नात्यांचे व त्यांना पुन्हा जुळवू पाहाणा-या माणसांच्या धडपडीचे चित्रण आढळते. शेवटी माणसाला काय महत्वाचे वाटते ? प्रेम की जीवनातले आदर्श ? सहजीवन महत्वाचे वाटते की व्यक्तिनिष्ठ मार्गावरुन एकाकी चालत राहणे ? निवड माणसाच्या हातात असते आणि नसतेदेखील, प्रत्येकाला आपला मार्ग हीच योग्य दिशा वाटते, आणि मग अपरिहार्यपणे माणसामाणसांत अंतर पडत जाते.
सर्व प्रकारच्या नात्यांमध्ये हे किती खरे आहे याची प्रचीती रोजच्या आयुष्यात आपल्याला येतच असते. वॆयक्तिक किंवा professional नात्यांनाही हे लागू होते. एखादा client, सहकारी, नातेवाईक, साधा रोजचा भाजीवाला व त्याच्याशी होणारी घासाघीस..जिथे कुठे बोलण्यात stretch येतो तिथे हे लक्षात येते की प्रत्येकाला आपला मार्ग बरोबर वाटतो. व त्यातून अंतर निर्माण होते.

परिचय चित्रपटाबद्दल मला जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे.. गुलजार यांचा देहबोलीचा अभ्यास.. जया भादुरी जेव्हा कधी प्राणच्या समोर येते तेव्हा ती हाताची नखे खाताना दिसते. कारण Nail biting हे shyness, stressful situation, nervousness बरोबर निगडित आहे. आणि प्राणचे व जयाचे नाते या सिनेमात सुरूवातीला तरी त्याच प्रकारचे आहे. गुलजार यांच्या सिनेमातले असे बारकावे मन वेधून घेतात.

परिचय या चित्रपटाशी लहानपणापासून ओळख होती पण त्याच्याशी परिचय विजय पाडळकर यांच्या पुस्तकाने करुन दिला.

Wednesday, January 14, 2009

slumdog millionaire, उत्खनन व गुलजार..

१. slumdog millionaire
काल slumdog millionaire पाहिला. अभिताभ बच्चनची craze, अनाथ मुलांना भिकारी बनविणा-या टोळ्या, वेश्यावस्ती, call center, KBC चा सेट, पोलिसांचे interrogation, लहान मुलांचे भावविश्व, गुंडगिरी, धर्मभेदावरुन होणा-या दंगली या व अशा असंख्य विषयांना हा सिनेमा स्पर्श करतो. पण तो फ़ारसा melodramatic होत नाही कारण अतिशय वेगाने घडणा-या घटना. चित्रपट पाहाताना आपण पुढे काय घडेल याची सतत धडधडत्या अंत:करणाने वाट पाहातो. नेहमीच्या हिंदी सिनेमाच्या पठडीतले आपल्या अपेक्षेप्रमाणे (शेवटची दहा मिनिटे सोडून .. ) काही घडत नाही. त्यामुळे चित्रपट बघताना त्या त्या व्यक्तिरेखे सोबत आपण जीवनाची वाट चालत असतो. नंतर विचार करायला लागल्यावर विविध विषय जाणवायला लागतात.

सर्व कलाकारांची कामे चांगली झाली आहेत. हिरोच्या भूमिकेतील देव पटेल चे सर्वात जास्त. हट्टी (Stubborn) भाव, जे हवे ते मिळवणारच असा एक निश्चय त्याच्या चेह-यावर सतत आहेत. मला त्यामानाने हिरॉइनचे काम त्या उंचीला पोहोचले नाही असे वाटले. अनिल कपूर त्याच्या भूमिकेत योग्य. इरफ़ान खानचे acting मला आवडते. पण मकबूलची उंची गाठणारा अभिनय यात फ़िका वाटतो. किंवा तो आता साचेबंद झाला आहे, असेही एकीकडे वाटले.

सिनेमाचे दिग्दर्शक Danny Boyle and Loveleen Tondon. विकास स्वरुप यांच्या Q&A या मूळ कथेवर Simon Beafoy यांनी पटकथा लिहिली आहे. A.R.Rehman यांना यासाठी golden globe मिळाले आहे. जय हो हे गाणे मस्त.

सिनेमा मला आवडला. पण काही प्रश्न मनात उभे राहिलेच.

२, गुलजार

जरा सी पीठ नंगी होती,
फ़टे हुए होते उसके कपडे,
लबों के गर प्यास की रेत होती
और एक दो दिन का फ़ाका होता

लबों पे सूखी हुइ सी पपडी
जरा सी तुमने जो छीली होती
तो खून का एक दाग होता..

तो फ़िर ये तस्वीर बिक ही जाती.

निरनिराळे आंतरराष्ट्रीय awards मिळणा-या केवळ सिनेमांबद्दलच नाही तर इतर पुरस्कारांबद्दलही (अरविंद अडिगा यांचे बुकर, टोनी मॉरिसन यांचे नोबेल इ.) हेच गणित मांडले जाते का ? हा प्रश्न पडतो.

३. उत्खनन – गौरी देशपांडे

उत्खनन या गौरी देशपांडेच्या कादंबरीत तुरूंगातील, वेड्यांच्या इस्पितळातील माणसं, फ़ूटपाथवर जगणारे भिकारी अपंग अशांच्या चित्राबद्दल ती म्हणते..

“जाता जाता त्यांना बघणं, डोक्यातल्या विचारांना त्यांचं अस्तित्व जाणवणं, आणि खुद्द जवळून, त्यांचा वास येईल इतक्या निकट जाऊन त्यांच्या आयुष्याला, मनाला, दु:खाला आपल्या आयुष्यावर आक्रमण करुन देणं, या पार वेगवेगळ्या गोष्टी आहेत.”

ती चित्रे काढणारा पुढे म्हणतो..

“स्वत:च्या आयुष्यातल्या ’नॉर्मल’ दु:खात गुंतून पडलेल्यांना अशा कुणाची दु:खं जाणवून द्यावी, हाच हेतू आहे या चित्रांचा’

slumdog millionaire सारखे चित्रपट बघून नॉर्मल दु:खात (कामाची बाई आली नाही, मोबाईलचे बिल वेळेवर भरले नाही, home loan EMI वाढला इ..) बुडालेल्या आपणही ते बघणं, त्यातील प्रश्नांसाठी मनात हळहळणं यापलीकडे काय करणार आहोत ? नेहमी असं काही घडलं, वाचलं, ऎकलं, पाहिलं की काय करतो ?

Friday, January 9, 2009

Cyrano De Berjerac .. राव जगदेव मार्तंड आणि.. जीवनाच्या पाकळीवर असीमपणे विलसणारं प्रेम..



फ़्रेंच आर्मीतील एक सरदार सिरॅनो हा , आक्रमक वृत्तीचा पण हरहुन्नरी आहे. त्याचे वॆशिष्ट्य म्हणजे तो एक, दॆवदत्त देणगी असलेला, भाषा ज्यावर प्रसन्न आहे असा कवी व संगीतकार आहे. पण.. पण त्याचे नाक जरा वाजवीपेक्षा जास्त लांब आहे. त्याला inferioity complex असण्याला लांबलचक नाक हे मोठे कारण आहे. यामुळेच तो त्याची दूरची नातेवाईक Roxane – जी अतिशय देखणी आहे, हिच्यावर असलेले प्रेम व्यक्त करायला घाबरतो आहे. त्याला वाटत असते की तो कुरुप असल्यामुळे तिच्या किंवा कोणत्याच स्त्रीच्या प्रेमाला पात्र नाही.

१. नाटक १६४० च्या काळातील पॅरिसमध्ये एका थिएटरमध्ये सुरु होते. पॅरिसमधील विविध स्तरांवरचे लोक तेथे जमलेले आहेत.
Christian हा सरदार आपल्या Lignière या मित्राबरोबर आलेला आहे. Christian चेही Roxane वर प्रेम आहे तिला Lignière ओळखतो. Lignière दुस-याच एका सरदाराचा (De Guiche) Roxane हिच्याशी लग्न करण्याचा मनसुबा तेथे उघड करतो. Lignière तेथून निघून गेल्यावार Christian याला Lignière ला मारण्याचा कट कळतो व त्याला तशी कल्पना देण्यासाठी तोही जातो.
इतर तीन सरदार सिरॅनोची वाट पाहात असतात. कारण आत्ता स्टेजवर चाललेल्या नाटकात जो नायक आहे (Montfleury) त्याला सिरॅनोने मागच्या महिन्यात हरविले आहे.
या सगळ्या गदारोळात सिरॅनो प्रवेश करतो. थिएटरच्या मालकाला त्याचे बुडालेले पॆसे देतो. स्टेजवरील नटाला आव्हान देतो.. लोक जायला लागतात. तर तिथल्या तिथे Montfleury बरोबर तलवारबाजी करत एक काव्य रचतो. त्याचे तलवारीचे हात व काव्यपंक्ती या हातात हात घालून जातात.
गर्दी कमी होत जाते. सिरॅनो एका सरदारापाशी आपले Roxane वरचे प्रेम कबूल करतो. तेवढ्यात तिची एक दासी येऊन सिरॅनोला Roxane ला तुला एकांतात भेटायचे आहे असा निरोप देते. दुसरा एक सरदार येऊन सिरॅनोच्या परतीच्या वाटेवर शंभर एक लोक त्याला मारायला टपले आहेत असा निरोप देतो. आता Roxane च्या निरोपामुळे अंगावर मूठभर मांस चढलेला सिरॅनो त्या सगळ्यांना एकट्याने तोंड द्यायचे ठरवतो.
२. दुस-या दिवशीची सकाळ. एक बेकरी. तिचा मालक आपल्या cooks ना घेऊन येतो. सिरॅनो येतो. त्याच्या Roxane च्या भेटीविषयी अर्थातच तो फ़ार फ़ार उत्सुक आहे. सिरॅनो Roxane ला आपले तिच्यावरचे गहिरे प्रेम व्यक्त करणारे एक लांबलचक पत्र लिहितो. आणि Roxane आल्यावर बेकरीच्या मालकाला आपल्याला एकांत मिळावा यासाठी तिथून निघून जाण्यासाठी खूण करतो. Roxane त्याच्याशी बोलता बोलता आद्ल्या दिवशीच्या शंभर लोकांबरोबरच्या चकमकीत जखमी झालेल्या त्याच्या हाताला bandage करते. आणि.. तिचे Christian वरचे प्रेम सिरॅनोला सांगते. Christian ज्या सॆनिकांसोबत आहे त्यांच्यामुळे तिला त्याच्या सुरक्षिततेची काळजी वाटत असते. ती सिरॅनोला त्याच्याशी मॆत्री करुन Christian चे रक्षण करण्याची गळ घालते. सिरॅनो या प्रस्तावाला होकार देतो. सिरॅनोचा captain तेवढ्यात येऊन आदल्या दिवशीच्या लढाईत जिंकल्याबद्दल त्याचे अभिनंदन करतो. त्याच्यामागे सॆनिकांचा एक घोळका आहे ज्यात Christian सुध्दा असतो. Christian नवीन असल्याने त्याला कालच्या लढाईची कथा सांगावी असा काहीजण आग्रह धरतात. Christian अनेकदा सिरॅनोच्या नाकाचा उल्लेख करुन त्यात लुडबूड करतो. अखेरीस सिरॅनो चिडतो.. गर्दी पांगते. व Christian आणि सिरॅनो एकमेकांचे मित्र बनतात. सिरॅनो Christian ला Roxane त्याच्याकडून एका प्रेमपत्राची अपेक्षा करते आहे असे सांगतो. Roxane गडबडतो व अशा बाबतीत आपल्याला गती नाही असे जाहीर करतो. सिरॅनो स्वत:च लिहून ठेवलेले पत्र त्याला देतो. Christian व सिरॅनो एकमेकांना मिठी मारतात ते पाहून इतर सॆनिक स्तिमितच होतात. परत त्यातील एकजण सिरॅनोच्या लांब नाकाची चेष्टा करतो व सिरॅनोकडून मार खातो.

३. काही दिवसांनंतर, Roxane च्या घराबाहेर तिच्या घरातील नोकर एकमेकांशी बोलत असतात. सिरॅनो येतो. Roxane येते ती Christian च्या लिखाणाची तारीफ़ करतच. (तिने मधल्या काळात ते पत्र वाचलेले आहे). De Guiche या सरदाराला Roxane सोबत लग्न करायचे आहे तो लढाईवर जाण्याआधी तिला भेटायला येतो व लग्नाचा प्रस्ताव मांडतो. Roxane नकार देते पण सॆनिकांनी पॅरिसमध्येच राहावे अशी विनंती करते. De Guiche जातो व सिरॅनो परत येतो. Roxane व तिची दासी जातात. सिरॅनो एकटाच उरतो. त्याला Christian ला भेटायचे आहे व काही गोष्टी शिकवायच्या आहेत. Christian येतो तो सिरॅनोला म्हणतो की Roxane चे प्रेम जिंकायला त्याला सिरॅनोच्या मदतीची गरज नाही. Roxane परत येते व तिच्या सौंदर्याचे वर्णन करायला Christian ला सांगते.. एकही शब्द त्याला सुचत नाही, हे पाहून ती निराश होते. तेवढ्यात सिरॅनो येतो व Christian त्याला मदत करायची विनंती करतो. रात्रीच्या अंधारात Roxane तिच्या बाल्क्ननीत असते.. खाली Christian व जरा लपलेला सिरॅनो.. तो एक एक वाक्य सांगतो व Christian ते Roxane ला म्हणून दाखवितो. यात हळूहळू अंधाराचा फ़ायदा घेऊन सिरॅनोच वाक्य बोलायला लागतो कारण त्याचा सांगण्याचा वेग Christian च्या वेगाशी पुरत नाही. Roxane खूष होऊन Christian चे चुंबन घेते. De Guiche कडून लग्नाचा प्रस्ताव मांडलेले एक पत्र घेऊन दूत येतो, ते पत्र घेऊन Roxane तिचे व Christian चे लग्न व्हावे असे एक नवीन पत्र ध चा मा style ने करते. Roxane च्या घरात तिचे व Christian चे लग्न लागत असताना De Guiche ला चंद्रावर स्वारी करण्याचे सात मार्ग अशी एक धमाल कथा सांगून अडवून ठेवण्याचे काम सिरॅनो करतो. या दोघांचे लग्न कळल्यावर De Guiche सर्व सॆनिकांना पॅरिसबाहेर लढाईला जायचा आदेश देतो. हताश झालेली Roxane सिरॅनोने Christian चे रक्षण करावे व Christian तिला पत्र लिहिल याची जबाबदारी घ्यावी असे सुचविते.

४. फ़्रेंच फ़ौजा स्पॅनिश फ़ौजांबरोबर लढत आहेत. Christian ची तुकडी हरते आहे व उपाशी मरते आहे. मधल्या काळात Christian च्या नावाने सिरॅनो Roxane ला रोज दोन पत्रे लिहितो व धोका पत्करुन तिच्या पर्यंत पोहोचवितो. De Guiche स्पॅनिश फ़ौजांबरोबर हात मिळवणी करुन त्यांना Christian च्या तुकडीवर हल्ला करायला सांगतो. तेवढ्यात एका घोडागाडीतून Roxane येते. स्पॅनिश लोकांच्या तावडीतून ती कशी तेथपर्यंत पोहोचली असे ती सांगत असते. तेव्हा गॆरसमज टाळ्ण्यासाठी सिरॅनो Christian ला त्याने लिहिलेल्या पत्रांबद्दल सांगतो व शेवटचे एक पत्र त्याच्याकडे देतो. Roxane ने सोबत अन्नपदार्थ आणलेले असतात ते ती त्यांना देते आणि Christian ला सांगते की त्याच्या पत्रांमुळे तिचे प्रेम शतगुणित झाले आहे. महत्वाचे म्हणजे तो कुरुप असता तरी तिने इतकेच प्रेम केले असते. हा निरोप Christian सिरॅनोला देतो.. ज्यावर त्याचा विश्वास बसत नाही. Christian सिरॅनोला पत्रे कोणी लिहीली आहेत ते मान्य करुन Roxane सोबत बोल असे सांगतो. पण तो ते सांगायच्या आधीच Christian घायाळ होऊन येतो.. Christian च्या भाषाप्रभुत्वाबद्द्ल Roxane चे विचार तसेच राहावेत यासाठी आता सिरॅनो गप्प राहाणेच स्वीकारतो. Roxane ला De Guiche व तिचा एक नोकर परत घेऊन जातात. सिरॅनो नवीन कुमक येईपर्यंत स्पॅनिश सॆनिकांना थोपविण्याच्या कामाला लागतो.

५. पंधरा वर्षांनंतर - एका चर्चमध्ये - Roxane येथे राहाते आहे. तिचा तिच्या लाडक्या Christian च्या मरणाचा शोक अजूनही चालूच आहे. तिला भेटायला तिचे नोकरचाकर, De Guiche मधूनमधून येतात. आज ती सिरॅनोची वाट पाहते आहे. तो तिला बाहेरच्या जगात काय काय घडले ते सांगतो. आज मात्र तो भयंकर जखमी झाला आहे. आता तो Roxane ला भेटायला येणार ते शेवटचेच. हे कळत असल्याने तो Roxane ला Christian ने लिहिलेले शेवटचे पत्र वाचायला सांगतो. ती ते त्याच्याच हातात देऊन त्याला वाचायला सांगते. आणि अंधारात तो ते पूर्ण पत्र वाचतो. अंधारात इतक्या सफ़ाईने त्याला पत्र वाचाताना पाहून व त्याचा आवाज ऎकून Roxane ला आता मात्र कळते की सगळ्या पत्रांचा मूळ लेखक सिरॅनो आहे…. तिच्यावर जिवापाड प्रेम करणारा सिरॅनो मात्र त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत ते नाकारतो. तो मरणाच्या दारात असताना त्याचे मित्र रडत असतात व Roxane त्याच्यावर आपले प्रेम असल्याचे सांगते. त्या क्षणी तो एक काल्पनिक लढाई खेळतो.. जी symbolic आहे.. त्यात म्हणतो की मी सगळ्या लढाया हरलो.. पण एक गोष्ट मात्र त्याच्या कडे आहे.. PANACHE.

You strip from me the laurel and the rose!
Take all! Despite you there is yet one thing
I hold against you all, and when, to-night,
I enter Christ's fair courts, and, lowly bowed,
Sweep with doffed casque the heavens' threshold blue,
One thing is left, that, void of stain or smutch,
I bear away despite you.

It is

MY PANACHE.

Panache हा शब्द आज प्रचंड आत्मविश्वास किंवा Style या अर्थाने वापरतात. सिरॅनो च्या या नाटककाराने तो इंग्लिश भाषेत रूढ केला.
-------------------------------------

राव जगदेव मार्तंड नावाचे एक पुस्तक माझ्या हातात साधारण दहा वर्षांपूर्वी आले. हे मंगेश पदकी यांनी लिहिलेले एक नाटक आहे. याच्या पहिल्या प्रयोगाचा तपशील वाचताना डॉ.श्रीराम लागू व स्मिता जयकर यांनी त्यात काम केल्याचा उल्लेख आढळतो. आज हे पुस्तक माझ्याकडे नाही.लमाण या श्रीराम लागूंच्या आत्मचरित्रात्मक पुस्तकात या नाटकाचा उल्लेख आहे.

ते पुस्तक वाचून तेव्हा मी झपाटून गेले होते. मूळ फ़्रेंच नाटक cyrano de berjerac यावरुन हे मराठी नाटक लिहिले आहे. Cyrano de Bergerac नावाच्या एका ख-या पात्रावर Edmond Rostand यांनी हे नाटक लिहिलेले आहे. पाच अंकी नाटकात पहिले चार प्रवेश १६४० मध्ये घडतात तर पाचवा १६५५ मध्ये. फ़ेंच भाषेत हे नाटक फ़ार प्रसिध्द आहे यावर अनेक सिनेमे, बॅले आहेत. English आवॄत्ती वाचताना देखील मूळ नाटककाराच्या प्रतिभेचा अंदाज येतो.

Roxane च्या सौंदर्याचे वर्णन..

She's a danger mortal,
All unsuspicious--full of charms unconscious,
Like a sweet perfumed rose--a snare of nature,
Within whose petals Cupid lurks in ambush!
He who has seen her smile has known perfection,
--Instilling into trifles grace's essence,
Divinity in every careless gesture;
Not Venus' self can mount her conch blown sea-ward,
As she can step into her chaise a porteurs,
Nor Dian fleet across the woods spring-flowered,
Light as my Lady o'er the stones of Paris

किंवा चंद्रावर स्वारी करण्याचे सात मार्ग.. यात काही मार्ग असे आहेत..

First, with body naked as your hand,
Festooned about with crystal flacons, full
O' th' tears the early morning dew distils;
My body to the sun's fierce rays exposed
To let it suck me up, as 't sucks the dew!

And then, the second way,
To generate wind--for my impetus--
To rarefy air, in a cedar case,
By mirrors placed icosahedron-wise.

Sitting on an iron platform--thence
To throw a magnet in the air. This is
A method well conceived--the magnet flown,
Infallibly the iron will pursue:
Then quick! relaunch your magnet, and you thus
Can mount and mount unmeasured distances!

या नाटकाबद्दल कितीही लिहिले तरी कमीच असे मला वाटते. प्रेम त्यागात असतं असं म्हणणं आणि तसं वागणं यात एक अंतर आहे. ते या व्यक्तिरेखेत मिटलं आहे. Larger than life अशी ही एक character आहे… cyrano de berjerac…

Saturday, January 3, 2009

पंचम

याद हॆ बारिशों का दिन पंचम
जब पहाडी के नीचे की वादी में
धुंद से झांक कर निकलती हुई
रेल की पटरियां गुजरती थी

धुंद मे ऎसे लग रहे थे हम
जॆसे दो पौधे पास बॆठे हो
हम बहुत देर तक वहां बॆठे
उस मुसाफ़िर का जिक्र करते रहे
जिस को आना था पिछली शब, लेकिन
उसकी आमद का वक्त टलता रहा

देर तक पटरियों मे बॆठे हुए
ट्रेन का इंतिजार करते रहे
ट्रेन आयी, ना उसका वक्त हुआ
और तुम युंही दो कदम चल कर
धुंद पर पांव रख के चल भी दिये

मॆं अकेला हूं धुंद में पंचम

गुलजार..

आज राहुलदेव बर्मन यांना जाऊन पंधरा वर्षे झाली. त्यानिमित्ताने ही गुलजार यांची नज्म.. 'धुंद पर पांव रख कर चल भी दिये' ही ओळ जिवलगांसाठी किती खरी असते.. वाळूसारखे हातातून त्यांच्याबरोबरचे क्षण निसटून जातातच.. ती माणसेही एक दिवस धुक्यात हरवितात.. मागे उरतात त्या फ़क्त आठवणी. कलाकार मात्र त्यांच्या कलेच्या रुपात अजरामर होतात.

Monday, December 22, 2008

काळे गाणे

१ Best poem nomination for २००५

When I born, I black,
When I grow up ,i black,
When I go in Sun, I black,
When I scared, I black,
When I sick, I black,
And when I die, Im still black,

And u white fella,
when u born, u pink,
When u grow up, u white,
When u go in sun, u red,
When u cold, u blue,
When u scared, u yellow,
When sick, उ green,
And when u die, u gray,
And u calling ME coloured???

२ On a British Airways flight from Johannesburg, a middle-aged, well-off white South African Lady has found herself sitting next to a black man। She called the cabin crew attendant over to complain about her seating। "What seems to be the problem Madam?" asked the attendant। "Can't you see?" she said " You've sat me next to a kaffir. I can't possibly sit next to this disgusting human. Find me another seat!" "Please calm down Madam." the stewardess relied. "The flight is very full today, but I'll tell you what I'll do-I'll go and check to see if we have any seats available in club or first class." The woman cocks a snooty look at the outraged black man beside her (not to mention many of the surrounding passengers). A few minutes later the stewardess returns with the good news, which she delivers to the lady, who cannot help but look at the people around her with a smug and self satisfied grin: "Madam, unfortunately, as I suspected, economy is full. I've spoken to the cabin services director, and club is also full. However, we do have one seat in first class." Before the lady has a chance to answer, the stewardess continues ... "It is most extraordinary to make this kind of upgrade, however, and I have had to get special permission from the captain. But, given the circumstances, the captain felt that it was outrageous that someone be forced to sit next to such an obnoxious person." With which, she turned to the black man sitting next to the woman, and said: "So if you'd like to get your things, sir, I have your seat ready for you..." At which point, apparently the surrounding passengers stood and gave a standing ovation while the black guy walks up to the front of the plane.
people will forget what you said .... people will forget what you did .... but people will never forget how you made them feel.

हे सर्व लिहिण्याचे कारण म्हणजे काल सकाळ मध्ये मुक्ता मनोहर यांचा मरियम मकेबा यांच्यावर लेख आहे. मरियम मकेबा यांच्या आत्म्चरित्राचा मराठी अनुवाद ’काळे गाणे’ सुमारे १० वर्षांपूर्वी वाचला होता. साऊथ आफ़िकेतील चालीरीती, अंधश्रध्दा आणि काळ्या वर्णासाठी व एक स्त्री म्हणून अशा दोन्ही पातळ्यांवर मरियम मकेबा यांनी किती लढा दिला हे त्या पुस्तकात प्रभावीपणे मांडले आहे.

एक होता कार्व्हर या पुस्तकातही कार्व्हर यांना काळे असण्याचा कसा त्रास सहन करावा लागतो हे येते.

मरियम मकेबा ११ नोव्हेंबर २००८ रोजी एका गाण्याच्या कार्यक्रमात असताना गेल्या. पुस्तकाची आठवण आली त्यानिमित्ताने हे लिखाण.

Friday, December 19, 2008

ATM व कही दूर जब दिन ढल जाये


ATM मधून पॆसे काढले. बाहेर आले तर एक college मधील मॆत्रिण दिसली. अनेक वर्षांनी भेटत होतो. त्यामुळे एकदम “तू, कुठे होतीस, आज इकडे कुठे” वगॆरेचा हलकल्लोळ झाला. (तोपर्यंत

तिचा सोबत असलेला नवरा पुतळा होऊन उभा होता…..!!)

मग एकदा भेटू, तो / ती आजकाल कुठे असते याची चौकशी व मोबाईल नं. ची देवाणघेवाण होऊन ती भेट संपली. मग दोन दिवसांनी माझ्या मोबाईलवर एका मुलीचा आवाज, “काय ओळखलंस का?” मी लगेच तिचा आवाज ओळखून तुला नंबर कोणी दिला तेही लक्षात आले असे सांगितले. मग एकदा असे सगळे college मधील चार-पाच जण भेटलो.

त्यातल्या एका मित्राचा भेटीनंतर दोन दिवसांनी फ़ोन आला. म्हणाला, मध्यंतरी कपाट आवरताना जुन्या वह्या सापड्ल्या. त्यातील chemistry च्या वहीत ’कही दूर जब दिन ढल जाये’ हे तू लिहून सुवाच्च अक्षरात लिहून दिलेलं गाणं सापडलं. खूप छान वाटलं.

मी ती वही, त्यातील गाणं सगळंच अर्थात विसरले होते. या निमित्ताने मग अनेक आठवणी काढल्या.

आनंद या सिनेमामधील हे गाणं सगळ्यांना आवडतं.. पण मला त्याहून जास्त आवडतं ते ..

मौत तू एक कविता हॆ
मुझसे एक कविता का वादा हॆ मिलेगी मुझको
डूबती नब्जोंमें जब दर्द को नींद आने लगे
जर्द सा चेहरा लेकर जव चांद उफ़क तक पहुंचे
दिन अभी पानी में हो, रात किनारे के करीब
ना अंधेरा ना उजाला हो, ना अभी रात ना दिन
जिस्म जब खत्म हो और रुह को जब सांस आये
मुझसे एक कविता का वादा हॆ मिलेगी मुझको…

Monday, December 15, 2008

अस्वस्थ अक्षरांच्या गर्दीत हिंडताना…


भल्या पहाटे सिंहगड चढलो.. चंद्र आकाशात दिसत होता. मस्त वाटले. वर जाऊन नेहमीप्रमाणे खेकडा भजी, दही, भाकरी, पिठलं खाल्लं. उतरायला सुरुवात केली. ८-१० वर्षाची २०-२५ मुलेमुली दिसली. कुठून आली आहेत विचारल्यावर रायगड असे कळले. त्यातल्या एका मुलीच्या हातात जड सामान, दुस-या हातात ओढणी.. मग माझा सोबती तिला म्हणाला.. चिमणे, तुझी ओढणी बांधून देतो. त्याने मस्तपॆकी तिच्या कमरेला ओढणी नीट बांधली. आता जरा तिला चढणे सोपे जाईल..

पुढे गेलो तर अजून एक बालचमू.. उरणहून आलेत असे कळले. समारंभाला जावे तसे पोशाख करुन सर्वजण आले होते. पुढे गेलो तर त्या मुलांच्या शिक्षिका एका माणसाचे आभार मानताना दिसल्या. त्या माणसाला सिंहगडाच्या पायथ्याशी एक चिमुकली पर्स सापडली होती. शाळेतील मुलीची होती असे सांगणारे कोणी भेटले. मग तो आत्ताच उतरुन गेला होता तरी परत चढायला लागला. साधारण १/३ वर चढल्यावर भेट्लेल्या त्या शिक्षिकेने ती पर्स ओळखली. त्यात ३० रुपये होते. त्या माणसाशी बोलल्यावर तो म्हणाला.. आपण शाळेत असताना ५ रुपये सुध्दा आपल्याला किती होते. मग त्या मुलीला हे ३० रुपये महत्वाचे असणार, या विचाराने मी येथपर्यंत आलो।
रोजच्या वर्तमानपत्रातील पॆशासाठी खून, मारहाण, फ़सवणूक इ. बातम्या वाचतो. या अनुभवाने रविवार एकदम आनंदात गेला. असेही अजून घडते तर.. !

Monday, December 8, 2008

झिहाल- ए-मुस्किन

झिहाल- ए-मुस्किन मुकों बा रंजिश, बहाल-ए-हिजरा बेचारा दिल हॆ
सुनायी देती हॆ जिसकी धडकन, तुम्हारा दिल या हमारा दिल हॆ

या गाण्यातील पहिल्या ओळीबाबत फ़ार कुतूहल होते. कारण या गाण्याचे गीतकार आहेत गुलजार.. पण पहिली ओळ गुलजारच्या typical शॆलीतली वाटत नव्हती.. व कळत तर अजिबातच नव्हती.

तर माहिती मिळाली ती अशी की ही ओळ सूफ़ी कवी आमिर खुस्त्रो यांच्या एका रचनेवरुन घेतली आहे.

झिहाल- ए-मुस्किन मुकों-बा रंजिश, बहाल-ए-हिजरा बेचारा दिल हॆ
याचा अर्थ आहे..
झिहाल = लक्ष देणे.
मिस्किन = गरीब.
मुकों = नकार
बा-रंजिश = दुष्ट हेतू, शत्रुत्व
बहाल = ताजा.
हिजरा = विरह

याचा एकूण अर्थ : बिचा-या त्या हृदयाकडे लक्ष दे आणि त्याच्याकडे शत्रुत्वाने पाहू नकोस. ते विरहाच्या जखमांनी विध्द झालेले आहे.

दर्द जब तेरी अता हॆ तो गिला किससे करे
हिज्र जब तूने दिया हॆ तो मिला किससे करे

या आशा भोसले यांनी गायलेल्या गझल मध्ये ही विरहाचे वर्णन आहे. सूफ़ी संतांच्या रचनांमध्ये प्रेम व अल्ला या दोघांनाही ब-याचशा रचना लागू पडतात. यात एक अर्थ अल्लापासून लांब गेलेला (त्याचा विरह झालेला) असाही असू शकतो.

Sunday, December 7, 2008

वाटा..


रस्ता हे प्रतीक घेऊन आयुष्याबद्दल अनेकांनी लिहिलं आहे. नेहमी रोज जाणवते ते म्हणजे…

तसा सरळही नसतो रस्ता
नशीबही नसते सरळ तसे
कळतही नाही ऋतूसारखे
बदलत जाती दिवस कसे..

गुलजार यांच्या कवितेत लिहिल्याप्रमाणे ..( येथे ’गुलजार बोलतो त्याची कविता होते’ या वाक्याची अपरिहार्य आठवण येते.. ) आपण एका कोणत्या तरी रस्त्यावरुन कायम चालत असतो.

सहरा की तरफ़ जाकर, इक राह बगूलों में खो जाती हॆ चकराकर
रुक रुकके झिझकती सी, इक मौत की ठंडी वादी में उतरती हॆ
इक राह उधडती सी, छिलती हुई काटों से, जंगल से गुजरती हॆ
इक दौड के जाती हॆ और कुदके गुजरती हॆ, अनजानी खलाओं में

उस मोड पे बॆठा हूं, जिस मोड से जाती हॆ हर इक तरफ़ राहें………

.. ’अनजानी खलाओं में’ जाणा-या वाटेवरुन चालताना

चलते रहते हॆ के चलना हॆ मुसाफ़िर का नसीब
किसको मालूम किधर के हॆ, कहां के हम हे ?

असेच कायम वाटत रहातं.

अनेकदा एकटेपणाची जाणीव होते. कित्येकदा तर एका प्रखर सत्याची जाणीव घेऊन दिवस उजाडतो. अत्युच्च आनंदाच्या किंवा अतिशय दु:खाच्या क्षणी,, खूप समर्थ आणि खूप असहाय्य वाटणा-या क्षणांत , तुमच्या विचारांत, तुमच्या कृतीत, स्वप्नात, जन्मताना, जगताना आणि मरताना आपण एकटे असतो. परत एकदा गुलजारच्या शब्दात..

किस कदर सीधा, सहल साफ़ हॆ रस्ता देखो
न किसी शाख का साया हॆ न दीवार की टेक
न किसी आंख की आहट
न किसी चेहरे का शोर
दूर तक कोई नही, कोई नही कोई नही

किस कदर सीधा, सहल साफ़ हॆ रस्ता देखो..

रोजच्या धावपळीत, नातेवाईक, सहकारी, यांच्याशी वागताना, ट्रीपला गेल्यावर, कॉफ़ीची order देऊन चहा आल्यावर, खूप आनंदाची बातमी घेऊन घरी गेल्यावर शेजारचा तरूण मुलगा गेल्याचे कळल्यावर एकच कळते की..

किसी के वास्ते राहॆ कहा बदलती हॆ
तुम अपने आप को खुद ही बदल सको तो चलो

यहां किसी को कोई रास्ता नही देता
मुझे गिराकर अगर तुम संभल सको तो चलो

व्यंकटेश माडगूळकर यांनी इतक्या नेटक्या शब्दात एका रस्त्याचे शब्दचित्र काढले आहे.

दोन्ही बाजूला दाट जंगल आणि मधूनच जाणारा हा तांबडा रस्ता म्हणजे जलरंगातले एक सुंदर निसर्गचित्र होते. इथल्या हवेला झाडांच्या मोहोराचा, मोहाच्या फ़ुलांचा, गवताचा मंद सुवास असे आणि नाना पाखरांच्या सकाळच्या कूजनाचा नाद असे. बाकी सर्वत्र शांत, प्रसन्न. भल्या सकाळी उठून एखादे ताजे वृत्तपत्र वाचावे तसा हा रस्ता मी वाचत असे. मोठमोठी शीर्षके असत. काल रात्रीपासून भल्या पहाटेपर्यंत घडलेल्या घटनांचा वृतांत इथे वाचायला मिळे.”


त्यापुढे ते म्हणतात..

तो रस्ता मी ताज्या वर्तमान पत्रासारखा वाचला आणि वाटा धुंडताना रहस्यकथेच्या पानातून वावरलो. सुतानं स्वर्गाला कसे जाता येतं ते ह्या वाटांनी मला दाखविले. काहीही मिळवायचं म्हणजे वाटा या तुडवाव्या लागतातच.”

शेवटी उरते ते एकच…………..

गम हो के खुशी दोनों कुछ देर के साथी हॆ
फ़िर रस्ता ही रस्ता हॆ हंसना हॆ ना रोना हॆ

Wednesday, December 3, 2008

हलका हलका उंस हुआ…

’दिल से’ हा सिनेमा प्रथम बघताना ’सतरंगी रे’ या गाण्याने फ़ार लक्ष वेधले गेले. त्यातल्या उंस (हलके हलके उंस हुआ) या शब्दाबद्द्ल कुतूहल वाढल्याने जरा नेटवरुन माहिती घेतली तर जे काय हाती लागले ते मांडते आहे..

यातले सात रंग म्हणजे प्रेमाच्या सात पाय-या (टप्पे म्हणाले तर त्यात सरळ रेषा येते पण चढत जाणे येत नाही.. असो) आहेत ज्या या सिनेमात रंगविल्या आहेत.

१. हब = आकर्षण
२. उंस = ओळख
३. इष्क = प्रेम
४. अकीदत = आदर
५. इबादत = पूजा
६. जुनून = भारुन जाणे, झपाटणे (जुनून चा एक अर्थ उठाव असा आहे.. जो शशीकपूरच्या जुनून चा आहे)
७. मौत

आता ते गाणे

तू ही तू तू ही तू सतरंगी रे, तू ही तू तू ही तू मनरंगी रे
दिल का साया हमसाया, सतरंगी रे मनरंगी रे
कोई नूर हॆ तू क्यूं दूर हॆ,तू, जब पास हॆ तू एहसास हॆ तूकोई ख्वाब या परछाई हॆ, सतरंगी रे..

इस बार बता मुंहजोर हवा ठहरेगी कहां

इश्क पर जोर नहीं हॆ यह वो आतिश गालिब
जो लगाये ना लगे और बुझाये ना बने

आंखोंने कुछ ऎसे छुआ,
हलका हलका उंस हुआ
दिल को यह महसूस हुआ

तू ही तू तू ही तू जीने की सारी खुशबू, तू ही तू तू ही तू आरजू आरजू
तेरी जिस्म को आंच को छुते ही मेरी सांस सुलगने लगती हॆ
मुझे इष्क दिलासे देता हॆ मेरे दर्द बिलखने लगते हॆ
छुती हॆ मुझे सरगोशी से, आंखों मे घुली खामोशी से
मॆ फ़र्श पे सजदे करता हूं कुछ होश में कुछ बेहोशी से

तेरी राहों मे उलझा उलझा हूं, तेरी बाहोंमें उलझा उलझा
सुलझाने दे होश मुझे तेरी चाहों मे उलझा हूं

मेरी जीना जुनून मेरा मरना जुनून अब इसके सिवा ना कोई सुकून
मुझे मौत की गोद में सोने दे , मेरी रुह में जिस्म डुबोने दे

कुसुमाग्रज म्हणतात तसे

वादळवेडी विस्मयकर ही दीर्घकुंतली जात..

कधी वणव्याच्या मुकुटावरती तुरा होऊनी फ़िरे,
देवघरातील होते केव्हा मंद शांत फ़ुलवात..
कधी पतीस्तव सती होऊनी सरणावरती चढे,
कधी जारास्तव विश्व जाळूनी घुसते वनवासात..
तीर्थरुप ही कधी वाहते अमल जान्हवीपरी,
कधी खिडकीतूनी मांसल हिरव्या नजरेची बरसात..
नागिण होऊनी कुठे टाकते कालकुटाच्या चुळा,
कुठे प्रकटतो हिच्याच देही इश्वरतेचा हात..
उषा होऊनी कधी करितसे प्रतिभेची लावणी,
कधी शालूसम नेसून बसते ही अवसेची रात..
हसणे रुसणे कधी दावते दवबिंदूची कुळी,
कधी खडकावर कठोरतेने करी लीलया मात..
ही रसरंगित करी सुगंधित जीवन म्हणती जया,
हीच ठेविते फ़ुटकळ मरणे किनखापी बटव्यात ..

याचा प्रत्यय या सिनेमात वारंवार येतो.

अर्थात शेवटी प्रेमाबद्दल शेवटचा शब्द म्हणजे कुसुमाग्रजांचीच एक कविता...

प्रेमयोग

प्रेम कुणावर करावं ?
कुणावरही करावं

प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं,
कुब्जेच्या विद्रुप कुबडावर करावं,
भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरुप चरणांवर करावं,
दुर्योधन-कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं।
प्रेम कुणावरही करावं।

प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं,
अर्जुन नावाच्या राजेन्द्रावर करावं,
बासरीतून पाझरणा-यासप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं,
यमुनेचा डोह जहरुन टाकणा-या कालियाच्या फण्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम
रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं,
वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं,
गाईच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं,
मोराच्या पिसा-यातीलअद् भुत लावण्यावर करावं,
प्रेम काळजाच्या नात्यावर करावं,प्रेम खड्गाच्या पात्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम
गोपींच्या मादक लीलांवर करावं,
पेंद्याच्या बोबडया बोलावर करावं,
यशोदेच्या दुधावर,
देवकीच्या आसवांवर,
प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं
कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं,
ज्याला तारायचं,
त्याच्यावर तर करावंच,
पण ज्याला मारायचं,
त्याच्यावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं

प्रेम
योगावर करावं,
भोगावर करावं,
आणि त्याहुनही अधिक,
त्यागावर करावं

प्रेम
चारी पुरुषार्थांची झिंग देणा-याजीवनाच्या द्रवावर करावं,
आणि पारध्याच्या बाणानं घायाळ हो ऊनअरण्यात एकाकी पडणा-यास्वतःच्या शवावरही करावं,
प्रेम कुणावरही करावं
कारण
प्रेम आहे
माणसाच्यासंस्कॄतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि
भविष्यकालातील
त्याच्या अभ्युदयाची आशा
एकमेव ..... !